नेट बंदीमुळे जुने दिवस आठवले : चौकात चौकात लोक गप्पा मारताना दिसले!
★चौकात चौकात गप्पा गोष्टी करताना लोक दिसल्याने जुन्या दिवसांची आठवण!
बीड | सचिन पवार
मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रावर वनव्यासारखा पेटला आणि सराटी अंतरवर येथे त्याच आंदोलनाची ठेंगी वनव्यासारखी भडकली. महात्मा गांधींच्या विचारावर मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी शांततेचा शस्त्र पुढे करत आंदोलनाची दिशा ठरवली परंतु दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याने बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर येथील नेट बंद करण्यात आले, त्यामुळे चौकात चौकामध्ये लोकांना गप्पा गोष्टीत रमलेलं पाहून जुन्या दिवसांची आठवण झाल्याचं दिसून आलं.
बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर येथे सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही ठिकाणी घडलेल्या हिंसक घटनेमुळे नेट बंदी करण्यात आली होती ही नेट बंदी फायद्याची ठरली का ? नाही हे आता सांगता येऊ शकत नाही परंतु लोकांना मात्र चौकात चौकामध्ये गप्पा गोष्टी करताना पाहिल्याने जुने दिवस परत आल्याचं दिसलं आणि लोकांमध्ये विचाराची देवाण-घेवाण करताना सुद्धा पाहायला मिळाले. एकूणच नेट बंदी ही जुन्या गोष्टींना उजाळा देणारी ठरली आहे. लोकांना एक दोन दिवसाची नेट बंदी ही एक दोन वर्षांसारखीच गेली आहे असे सुद्धा लोकांच्या चर्चेमधून ऐकायला मिळाला आहे. या नेटबंदीमुळे लोकांना आपण स्वतः किती इंटरनेटच्या आहारी गेलो हे सुद्धा जाणवलं.. नोटबंदी मध्ये जेवढा त्रास झाला नाही तेवढा नेट बंदीमुळे दोन झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्रासदायक ठरली असे सुद्धा लोकांच्या चर्चेतून पुढे आलं.. लोकांनी आपण किती इंटरनेटच्या आहारी गेलो त्यातून किती त्रास होतोय हे सुद्धा जाणून घेतलं आणि स्वतःला बदल करण्याचं ठरवलेलं सुद्धा काही नागरिकांच्या चर्चेतून समोर आले आहे..
★नेट बंदी ठरली स्वतःला सावरणारी!
बीड धाराशिव जालना संभाजीनगर येथे झालेली नेट बंदी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांची झालेली मानसिक शांतता पाहून. काही लोकांनी नेट बंदीचा समर्थन करत मानसिक आरोग्याला लाभदायक ठरल्या अशा सुद्धा प्रतिक्रिया आल्या आहेत. एकूणच नेट बंद ही स्वतःला नेटच्या आहारी जाण्यापासून सावरणारी ठरली आहे. नेटच्या अतिवापरामुळे झालेले परिणाम आणि नेटबंदीमुळे स्वतःला सावरण्याची मिळालेली संधी ही नक्कीच येणाऱ्या काळात फलदायी ठरू शकते असंच म्हणावं लागेल…
★नोट बंदी पेक्षा नेट बंदी जनतेला सर्वात ठरली कठीण!
मध्यंतरी झालेली नोटबंदी त्यातून झालेला त्रास हा खूपच कमी होता हे नेट बंदी झाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं. नोटबंदी जेवढा त्रास झाला नाही तेवढा दोन दिवस नेट बंद झाल्याने त्रास झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर आले आहेत. एकूणच सर्वसामान्य नागरिक आणि युवक नेटच्या आहारी किती गेलेत हे आपल्याला यावरून लक्षात येतच असेल. नेटचा अतिवापर किती घातक ठरू शकतो यावरून आपण अंदाज लावू शकतात…
★नेटचा अतिवापर टाळा मित्रांनो..
इंटरनेट हे मानवी जीवनासाठी अति घातक आहे त्याचा अतिवापर टाळला पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे इंटरनेट किती घातक आहे. वेळ निघून गेल्यानंतर लक्षात येईल परंतु नेटबंदीमुळे लोकांच्या ते लक्षात आले आहे आता तरी तुम्ही स्वतःला सावरा आणि अति नेटचा वापर टाळा एवढीच ” लोकवास्तव ” च्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे.