मराठ्यांचा गनिमी कावा कुठे अग्नीतांडव तर कुठे शांततेचे शस्त्र!
★मराठा आरक्षण तीव्र ; सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत वांजरा फाटा रस्ता बंद!
कुसळंब | सचिन पवार
पाटोदा तालुक्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न झाला तीव्र अनेक ठिकाणी शांततेत तर अनेक ठिकाणी उग्र आंदोलन. पाटोदा तालुक्यातील बांद्रा फाटा येथे बीड नगर महामार्ग सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत बंदच होता. वाहतूक ठप्प झाली होती लांबच्या लांब रांगा लागल्या होत. आता युवकांनी मांजरा फाट्यावर टायर जाळत मोठा अग्नी तांडव उभा केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
बीड नगर महामार्गावरील मांजरा फाटा येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्न मराठा युवकांनी अग्नि तांडव केला. टायर, मोठाले लाकडं टाकून वाहतूक ठप्प केली होती. मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढा नाहीतर येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये अग्नीतांडव होईल. तरदेखील मराठा बांधवांकडून देण्यात येत आहे. रोजगार अंगींच्या जीवाला धोका झाल्यास महाराष्ट्रामध्ये काय होईल सांगता येत नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अन्यथा महाराष्ट्रामध्ये काय होईल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. मनोज जरांगे यांचा जीवाचं काही बरं वाईट झाल्यास महाराष्ट्रामध्ये काय होईल आणि काय नाही याचा विचार न केलेलाच बरा असा इशारा देखील महाराष्ट्रातील काढा आणि तसेच आंदोलन शांत करा एवढीच मराठा बांधवांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
★वांजरा फाट्यावर अचानक अग्नीतांडव वाहतूक ठप्प!
मराठा आरक्षणासाठी बीड नगर महामार्गावरील वांजरा फाटा येथे मराठा युवकांनी टायर मोठाले लाकडं टाकून अग्नी तांडव केला. सात वाजल्यापासून एक वाजेपर्यंत हा अग्नी तांडव भडका घेत होता तोपर्यंत वाहनाचा रागाचे रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. परंतु मराठा युवकांनी महाडा मधील सर्व नागरिकांना पाण्याची व नाष्ट्याची व्यवस्था करून पुन्हा एकदा माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम केलं आहे.
★मराठा योद्धा मनोज जरांगेंचा जीव म्हणजे मराठ्यांचा जीव!
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे यांचा जीव हा आता पाच कोटी मराठ्यांचा जीव झाला आहे, त्यामुळे त्यांच्या जीवाचं काय झालं तर पाच कोटी मराठ्यांच्या जीवाचं झालं असा अर्थ होईल त्यामुळे मनोज जरांगे यांचा जीव सरकारने जाणावा आणि मराठ्यांना आरक्षण तात्काळ द्यावे अन्यथा महाराष्ट्र मध्ये काय होईल सांगता येत नाही असा इशारा देखील मराठा बांधवांकडून देण्यात आला आहे.