23.9 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आ.बाळासाहेब आजबेंचा पाठिंबा

★सरकारने वेळकाढू पणा न करता मराठा समजला टिकेल असे आरक्षण द्यावे – आ.आजबे

आष्टी | प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनत चालला आहे. सरकारने वेळकाढू पणा न करता कोर्टात टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला द्यावे. माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका ही मराठ्याला आरक्षण मिळावे अशीच आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणा संदर्भात आ. बाळासाहेब आजबे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.
आष्टी येथील कार्यालयामध्ये बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, मराठा समाजामध्ये अनेक गरीब लोक आहेत. समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे सरकारने वेळ काढू पणा न करता कोर्टात टिकेल असे आरक्षण द्यावे. मी आणि माझा पक्ष आरक्षण संदर्भात संवेदनशील आहे. यापुर्वी देखील पक्षाचे वरिष्ठ नेते अजित दादा पवार यांच्याकडे माझे मत मांडले आहे. तसे उद्या दि. 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत देखील आम्ही मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात चर्चा करणार आहोत. या बैठकीत सर्व समाजाच्या भावना मांडणार आहोत. आंदोलनाने तीव्ररूप धारण केले आहे. सर्वांनी शांततेत आंदोलन करावे. हिंसक आंदोलन करूनये. गावागावात आंदोलन सुरू असल्याने सरकारवर दबाव आहे. त्याच बरोबर तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेऊन नयेत. आपण आत्महत्य केल्यास आपल्या कुटुंबावर वाईट वेळ येईल. शांततेत आंदोलन करावे असे आवाहन आ. बाळासाहेब आजबे यांनी मराठा समाज बांधवांना केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!