कुसळंबच्या मराठ्यांनी काढलेली कुपोषित सरकार नेत्यांची अंत्ययात्रा मीडियातून सरकारच्या दारी पोहोचली
★मराठ्यांची आरक्षणाची धगधगता वाढू लागली ; सरकारचे धाबे दणाणले!
कुसळंब | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील कुसळंब गाव मराठा आरक्षणाच्या लढ्यात नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. आता मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असताना कुसळंब येथील मराठा बांधवांनी एकत्रित येऊन कुपोषित सरकार आणि नेत्याची अंत्ययात्रा काढून यमसदनी धाडले आहे. कोणत्याच कामाचं नसणाऱ्या सरकारला आणि त्या सरकारमध्ये काम करणाऱ्या सर्व कुपोषित नेत्यांना कुसळंब येथील ग्रामस्थांनी यमराजाकडे पाठवून एकदाचा आराम घेतला आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे आंदोलन अधिक तीव्र होत असून शांततेच्या युद्धामध्ये कुसळंबाच्या ग्रामस्थांनी देखील तितक्याच हिरारी ने भाग घेत आंदोलन तीव्र केल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे यांची तब्येत खलावत चालल्याने महाराष्ट्रातील सर्व गावाची गाव आता रुद्र अवतार घेऊ लागले आहेत कुसळंब येथे सर कुपोषित सरकार आणि नेत्यांची अंत्ययात्रा काढून सरकारला यम सदनी धाडले आहे. येणाऱ्या काळात यापेक्षा अधिक तीव्र पण शांततेच आंदोलन कुसळंब येथे होईल आणि ते नक्कीच दिशादर्शक ठरेल यातही तेल मात्र शंका उरली नाही. सरकार आणि नेत्यांच्या अंतयात्रेमध्ये कुसळंब सह परिसरातील ग्रामस्थ महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने या अंतयात्रेमध्ये सहभागी होऊन आरक्षणाची ढग अधिक तेवढ्यासाठी पुढे आले आहेत.
★पुढचे आंदोलन अधिक तीव्र असेल..
कुसळंब येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. रविवार दिनांक 29 रोजी सकाळी कुपोषित सरकार आणि नेत्यांची अंत्ययात्रा काढून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला यामध्ये गावची गाव सहभागी झाले होते येणाऱ्या काळात अधिक तीव्र गनिमी काव्यातून आंदोलन करणार असल्याचा सुद्धा कुसळंबाच्या नागरिकांनी सांगितले आहे.
★कुपोषित सरकार नेत्यांची अंत्ययात्रा मीडियातून सरकारच्या दारी पोहोचली
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे कुपोषित सरकार नेत्यांची काढलेली अंत्ययात्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या दारी पोहोचली आहे. येणाऱ्या काळात अशी यंत्र अशी अंत्ययात्रा निघेल किती सरकारला खरंच यमसदनी पोहोच करेल यातील मात्र शंका नाही असं चित्र कुसळंबवासीयांकडून दिसत आहे.
★एक नाही धड भाराभर चिंध्या!
मराठा समाजातील नेते म्हणजे एक नाही धड आणि भाराभर चिंध्या अशी अवस्था मराठा समाजातील नेत्यांची झाली आहे महत्त्वाचे पदावर बसून देखील मराठा आरक्षणाबद्दल सरकार एक शब्द बोलायला तयार नाहीत. सर्वसामान्य मराठा समाज रस्त्यावर उतरलाय आणि त्याच मराठा समाजाच्या जीवावर हाच पर्यंत स्वतःची काळजी टिकून ठेवली पण समाजावर वेळ असताना स्वतः मात्र त्याच गादीवर आराम करताना नेते दिसत आहेत पण तुम्हाला त्याच गादिला कधी भोक पडतील हे सुद्धा कळणार नाही. अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य मराठा समाजातून पुढे येत आहेत.
★कुसळंबाच्या मराठ्यांचा रुद्रअवतार!
कुसळंबच्या मराठ्यांनी सरकारची आणि नेत्यांची अंतयात्रा काढून रुद्रअवतार व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात सरकारची खरच अंतयात्रा काढण्याची वेळ कुसळंबकरांवर येऊ नये म्हणजे बास… मराठा आरक्षण जर मिळालं नाही तर खऱ्या अर्थाने सरकार आणि नेत्यांची खरी अंत्ययात्रा कुसळंब येथील मराठे काढतील यात शंका उरली नाही.. आता मराठ्यांचा अंत पाहू नका आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा आणि मनोज जरांगे यांचा जीव वाचवा अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे.