सरकारने भानावर यावं! पाच कोटी मराठ्यांचा जीव म्हणजेच मनोज जरांगे
★मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने निकाली काढून मनोज जरांगे च्या रूपाने पाच कोटी मराठ्यांचा जीव वाचवावा!
बीड | सचिन पवार
मराठा आरक्षणाचा लढा दुसऱ्या टप्प्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या धरणे आमरण उपोषणाला सरकारने विनंती करून तीस दिवस घेत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू असं सांगितलं होतं. सरकारच्या त्या विनंतीला मान देत 40 दिवस मराठा समाजाकडून देण्यात आले परंतु तरीदेखील मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न निघाल्याने पुन्हा एकदा मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी न पेलणारा न झोपणार आमरण उपोषण अंतरवली येथे चालू करून महाराष्ट्रातील मराठा समाजाला आपल्या गावामध्ये साखळी उपोषण चालू करण्याचा आव्हान केले आणि सरकारचं नाक दाबून तोंड उघडण्याचा गनिमी कावा सुरू केला. संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या 40 दिवसानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचा शस्त्र उभारले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये धरणे आंदोलन सुरू करून महाराष्ट्रातील सरकार नेत्यांचं नाक दाबून तोंड उघडण्याचे काम सुरू केले आहे परंतु अंतरवली येथे मराठा युद्ध मनोज जरांगे यांनी सुरू केलेलं अमरन उपोषण हे मराठा समाजाच्या हिताचा जरी असलं तरी त्यांच्या जीवाला धोका सुद्धा वाढत चालला आहे उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालल्याने समाजामध्ये अधिक चीड निर्माण होत चालली आहे सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. तसेच मनोज जरांगे यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्रात काय होईल सांगता येत नाही असा इशारा मराठा सेवक किशोर पिंगळे यांनी मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
★मराठ्यांचा गनिमी कावा सरकारचा गळा घोटेल!
मराठ्यांनी आता गनिमी काव्याचा शस्त्र बाहेर काढला आहे याची परिणाम सरकारला खूपच महागात पडतील मात्र शंका नाही मराठी किंवा सरकारचा गळा घोटतील हे देखील सरकारला कळणार नाही त्यामुळे सरकारने आता मराठ्यांचा अंत पाहू नये गळ्यापर्यंत येईल याची वाट पाहू नये मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ आणि कार्य करावा अन्यथा तुमच्या गळ्यावर मराठ्यांचं आग्या मोहोळ बसेल यातील मात्र शंका नाही.
★गावागावात तीव्र आंदोलन पण शांततेत!
महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आंदोलनात सहभागी झाले आहे तीव्रता अधिक वाढ झाली आहे पण शांततेत आंदोलन सुरू आहे हेच शांततेचे युद्ध महाराष्ट्र सरकारच्या आणि नेते मंडळीच्या मुंडक्यावर बसणार आहे तुमच्या मुंडक्यापर्यंत येईल याची वाट पाहू नका अन्यथा मराठे दिसतील परंतु मराठ्यांच्या जीवावर राज्य करणारे राजकारणी दिसणार राज्यातील मात्र शंका नाही.
★पाच कोटी मराठ्यांचा जीव म्हणजे मनोज जरांगे!
मराठ्यांना एकत्रित करून मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेले शांततेचे युद्ध आता सरकारच्या गळा घोटण्यासाठी रुद्र अवतार घेत आहे. सरकारने स्वतःचाही आणि मराठ्यांचाही अंत पाहू नये अन्यथा काय होईल हे देव जाणे…..