पाटोद्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम मराठ्यांनी उधळला!
★पाटोदा तालुक्यात एकही शासन आणि नेत्यांचा कार्यक्रमावर बहिष्कार!
पाटोदा | सचिन पवार
शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन पाटोदा प्रशासनाच्या वतीने वसंत दादा पाटील महाविद्यालयात सभागृहात आयोजन करण्यात आले होते.मात्र सरकारने मराठा समाजाला आरक्षणसाठी वेळ 30 दिवसाचा मागितला होता.मराठा समाजाने 40 दिवस दिलें तरी प्रश़्न सुटला नसल्याने मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी या ठिकाणी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केल्यानंतर त्याच्या आंदोलन व उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने पाठींबा म्हणून साखळी उपोषण चालू आहे.दि.27 शुक्रवार आक्टोबर रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्यावतीने वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा येथे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी सकल मराठा समाजाच्या तरुणांनी हा कार्यक्रम उधळून लावला असून सकल मराठा समाजाच्या वतीने आव्हाण करण्यात आले आहे जोपर्यंत मराठा आरक्षण प्रश़्न मार्गी लागत नाही तो पर्यंत शासनाचा एक ही कार्यक्रम होऊन देणार नाही.असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.
★तुम्ही जा तुमच्या दारी!
पाटोदा तालुक्यामध्ये सर्वांनी आता आक्रमक पवित्रा घेत शासनाचा तसेच नेत्यांचा कोणताच कार्यक्रम होणार नाही त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण स्वतःहून एकही कार्यक्रम पाटोदा तालुक्यात घेऊ नये आणि घेतलीस तो तुमच्या घरी पाठवला जाईल असा मराठा समाजाकडून इशारा देण्यात आला आहे. आता पाटोदा तालुक्यामध्ये शासन आणि नेत्यांना म्हटलं जात आहे तुम्ही जा तुमच्या दारी. जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हाच तुम्ही या आमच्या दारी…
★शासनाच्या कार्यक्रमाला मराठ्यांचे कुलूप
पाटोदा येथे शासन आपल्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्या वतीने वसंत दादा पाटील महाविद्यालय पाटोदा येथे करण्यात आले होते परंतु या ठिकाणी सकल मराठा बांधवांनी जाऊन हा कार्यक्रम उधळून लावला आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कार्यक्रम होणार नाही म्हणत शासनाच्या कार्यक्रमाला कुलूप ठोकले आहे.
★आधी आरक्षण मग तुमचे कार्यक्रम
समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शासनाने नेत्याने घराच्या बाहेर निघू नये अन्यथा तुमचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल असाच इशारा दिला जात आहे एकही कार्यक्रम होणार नाही आणि होऊन देणार नाही म्हणत मराठा समाज पाटोदा तालुक्यामध्ये आक्रमक झालेला पाहायला मिळाला. आता तर मराठ्यांना आरक्षण मिळणारच अन्यथा तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार यातील मात्र शंका नाही असंच चित्र पाटोदा तालुक्यामध्ये दिसत आहे.