नेत्यांनो बसा बोंबलत! जनता मतदानावरच टाकणार बहिष्कार!
[ सुप्पा व कुसळंब ग्रामस्थांचा आदर्श घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाका! ]
★मराठा आरक्षणापेक्षा निवडणूक महत्त्वाची वाटणारे मुगगाव, वाहलीचे काही नेते निवडणुकीत मग्न!
कुसळंब | सचिन पवार
सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा वेग धरत आहे. मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रभर मराठा व धनगर समाज ग्रामपंचायत आणि आगामी सर्व निवडणूकांवर बहिष्कार घालत असतानाच पाटोदा तालुक्यातील काही गावे विशेष करून मौजे वहाली व मुगगाव मधील खंडोजी खोपडेच्या विचारांच्या नेते मंडळी कडून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याऐवजी स्वार्थासाठी निवडणुकीत मग्न होवून आपली प्रतिष्ठा जपण्याचा केविलवाणी प्रयत्न सुरू असल्याचं चित्र दिसत आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू आहेत. तर धगनर आरक्षणाचा मुद्दाही तापत आहे. त्यांचेही उपोषणे सुरू आहेत. शिवाय जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी मराठा आरक्षणासाठी निवडणूकीवर बहिष्कार घातला आहे. समाजाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी अनेक गावांतील ग्रामस्थांनी एकजूट दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच्या सर्व उमदेवारी अर्ज मागे घेवून बहिष्कार घालत आहेत. तसे निवेदने मराठा असलेल्या गावच्या गावे तहसीलदार यांना निवेदने देत आहेत. तसेच पदावर विराजमान असलेले मराठा बांधव आपल्या पदाचे राजीनामे देत आहेत. समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गावातील अठरा-पगड जातीतील बांधव मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत असतानाच काही गावात मात्र खंडोजी खोपडे सारखे काही नेतेमंडळी मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करत नसल्याचे दिसत आहे. यावरून आजही खंडोजी खोपडे जिवंत असल्याचे दिसत आहे.
★जनता म्हणते आमचा मतदानावर बहिष्कार!
पाटोदा तालुक्यातील 90 टक्के ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे परंतु दहा टक्क्यांमध्ये वहाली मुगगाव तसेच आणि इतर गावांनी निवडणुका घेऊन मराठा आरक्षणापेक्षा निवडणूक महत्त्वाची असल्याचे दाखवून दिले आहे परंतु सर्वसामान्य मतदार म्हणत आहेत आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आता मतदान करणार नाहीत नेते जरी जोमात असले तरी आम्ही त्यांना कोमात घालू असा इशारा सर्वसामान्य जनतेने दिला आहे. नेतेमंडळी हो आता निवडणुकीवर बहिष्कार टाका तुमच्या निवडणुकीच्या पेट्या बंद करा अन्यथा आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू असा इशारा सर्वसामान्य जनतेने दिला आहे.
★वहाली, मुगगावच्या नेत्यांना आरक्षणापेक्षा निवडणूक महत्त्वाची वाटते का ?
मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होत असताना सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीत खुसपट काढून आरक्षणाचा मुद्दा डीवाईड करण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वसामान्य जनतेने मात्र निवडणुकीवर बहिष्कार टाकला. पण काही खंडोजी खोपडे सारखे भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांना देखील सर्वसामान्य जनतेने इशारा दिला आहे तुम्ही जर तुमच्या पेट्या बंद केल्या नाहीत आणि बहिष्कार टाकला नाही तर सर्वसामान्य जनता मतदानावर बहिष्कार टाकेन असा इशारा देण्यात आला आहे. मराठा आरक्षणापेक्षा नेत्यांना निवडणूक महत्त्वाची वाटत आहे असंच एकूण चित्र दिसत आहे.
★नेत्यांनो निवडणुका येतील जातील पण आरक्षणाचा काय ?
सर्वसामान्य नागरिकांनी मराठा आरक्षणाचा लढा हाती घेतला आहे परंतु नेत्यांनी निवडणुकीच्या रणसिंग संपल्याने सर्वसामान्य जनता आक्रमक झाली आहे. आणि गावामध्ये निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर काही गावातील नेत्यांनी निवडणुका लढवण्याचा ठरवलं यावरून त्यांना आरक्षणाचे महत्त्व कळलेलं नाही असं दिसत आहे. नेत्यांनो निवडणुका येतील जातीन पण आरक्षणाचा काय असा प्रश्न उपस्थित करत आम्ही आता मतावरच बहिष्कार टाकत आहोत असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता बसा बोंबलत…
★नेत्यांनो तुम्हाला अजून संधी मतदानाच्या पेट्या बंद करा..
मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे परंतु ज्या गावांनी बहिष्कार अजून टाकलेला नाही त्यांना अजून संधी आहे तुम्ही तुमच्या मतदानाच्या पेट्या बंद करून निवडणुकीवर बहिष्कार जाहीर करा अन्यथा मतदानावर जनता बहिष्कार टाकेल असा इशारा देण्यात आला आहे…