ग्रामस्थांना संदेश !
ग्रामपंचायत लढविणाऱ्यांनो थोड्या दिवस थांबा
काही काळासाठी निवडणूक आता तुम्ही लांबा!
मतदानावर तुम्ही आता बहिष्कार टाका
गावातली एकी प्रशासनाला तुम्ही दाखा!
भरलेले फॉर्म तुम्ही सगळेजण बाहेर काढा
आमचा बहिष्कार असं पत्र शासनाला धाडा!
राजकीय नेत्यांना गाव बंदीचा बोर्ड लावा चौकात
कार्यकर्ता बोल्यावर दाखवा त्याची औकात!
नेता गावात यायला लागल्यावर द्या गो बॅकचे नारे
त्यांना सांगा जोरात वाहत आहे आरक्षणाचे वारे!
आमदार खासदार यांचा आडवा ताफा
मराठा आरक्षणावरून त्यांना खूप झापा!
त्यांना सांगा मराठा आरक्षणावर आवाज उठवा
मराठ्यांना आरक्षण देऊन हा विषय मिटवा !
सरपंच व्हायचा विषय आणू नका डोक्यात
आरक्षणाचा विषय आला आहे मोक्यात !
गावकऱ्यांनो सगळेजण आंदोलनाची वाट धरा
मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाचे पालन करा!
(श्री.भराटे सर जि, प,प्रा शाळा वसंतवाडी ता – पाटोदा जि – बीड मो.नं 8766817672)