23.9 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

निवडणुकीपेक्षा मराठा आरक्षण महत्त्वाचं ; सुप्पा ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार!

★ग्रामपंचायत निवडणुकीवर सुप्पा ग्रामस्थांचा बहिष्कार ; भरलेले अर्ज घेणार परत

कुसळंब | सचिन पवार

पाटोदा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसिंग फुंकल असलं तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा अति जिव्हाळ्याचा असल्याने सर्व ग्रामपंचायतने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचा दिसत आहे. कुसळंब ग्रामस्थांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार आणि त्या पाठोपात सुप्पा ग्रामस्थांनी देखील ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचा जाहीर केले.
शेवटी मराठा आरक्षण महत्त्वाचे समजून पाटोदा तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतच्या सर्व सरपंच सदस्यांनी पदासाठी भरलेले अर्ज पाठीमागे घेण्याचा निर्णय घेतला आणि मराठा आरक्षण मिळेपर्यंत आमचा निवडणुकीवर बहिष्कार असल्याचं जाहीर करून सरकारला प्रशासनाला चांगलाच इशारा दिला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सुप्पा गावची निवडणूक होणार नाही असं सर्वानुमते ठरवून मराठा आरक्षणाचा निकाल लवकरात लवकर काढा असे आव्हानच केले आहे.

★शेवटी मराठा आरक्षण महत्त्वाच आमचा पण बहिष्कार!

मराठा आरक्षणाची ठिणगी भडका घेताना प्रत्येक गावची गाव आता पेटून उठली आहेत सरकारला जागा करण्यासाठी प्रशासनाला एकावर एक धक्के देण्याचे काम ग्रामस्थ आणि मराठा समाज करत आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळण्यासाठी सरकारने ग्रामपंचायतची निवडणूक लावली परंतु गाव पातळीवरील मराठा समाज इतर समाजाला एक सोबत घेऊन सरकारची झोप उडवायला निघाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत प्रशासनाला मराठा आरक्षण देण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही कोणतीच निवडणूक लढणार नाहीत आणि मतदान करणार नाहीत असेच सर्वसामान्य मराठ्यांच्या तोंडून सूर निघत आहे आता तरी जागे व्हा मायबाप सरकार अन्यथा तुम्हाला कायमचं हद्दपार करतील हे मराठे… अशा भावना सर्वसामान्य मराठा आणि इतर समाजामधून व्यक्त होत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!