क्रांतिकारकाच्या पाटोदा तालुक्याला मराठा आरक्षणासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची सुवर्णसंधी!
★कुसळंबकरांच्या निवडणुकीवरील
बहिष्काराचं अनुकरण इतर गावांनी केलं तर क्रांती घडेल!
पाटोदा | सचिन पवार
मराठा आरक्षणाचा मुद्दा अति महत्त्वाचा असताना देखील महाराष्ट्र सरकारने कूटनीतीचा वापर करत गावागावांमध्ये वाद लावण्यासाठी निवडणुकीचा रणसिंग फुंकले आहे. परंतु अनेक ठिकाणी मराठा समाजाने ग्रामपंचायत निवडणुकीवर जाहीर बहिष्कार टाकल्याचे चित्र समोर आले आहे यातून मराठा समाजाचा रोज किती वाढला आहे हे स्पष्ट होत आहे. पाटोदा तालुक्यातील कुसळंब गावच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आणि कुसळंब गावाने निर्णय घेतला आपल्या गावात कोणतीही निवडणूक होणार नाही त्यावर आपण बहिष्कार टाकू एक मताने निर्णय झाला आणि उर्वरित सर्वच सदस्याने राजीनामे देत सर्व निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केला. हीच ठिणगी आता उर्वरित गावात देखील पसरले आहे फॉर्म काढण्याच्या तारखेपर्यंत अनेक गावे आपला बहिष्कार जाहीर करतील असे चित्र स्पष्ट झाले आहे.
पाटोदा तालुका हा क्रांतिकारकाचा तालुका म्हणून ओळखला जातो आता मराठा आरक्षणासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची सुवर्णसंधी पाटोदा तालुक्याला आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची सुरुवात कुसळंब गावाने करून दिली आहे. आता इतर गावाने देखील कुसळंब सारखा आदर्श निर्णय घेऊन क्रांती घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं अशीच अपेक्षा मराठा समाजातून व्यक्त होत आहे. पाटोदा तालुक्याला अशी संधी पुन्हा येणार नाही त्यामुळे ज्या ज्या गावातील इच्छुक सरपंच सदस्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांनी फॉर्म माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत थोडा विचार करावा आणि मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपण निवडणुकीवर बहिष्कार जाहीर करावा अशीच अपेक्षा व्यक्त करून बहिष्काराची क्रांती घडवण्याची आपणही साक्षीदार व्हावेत अशीच अपेक्षा सर्व पाटोदा तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांमधून मराठा समाजामधून व्यक्त होत आहे.
★कुसळंबकरांसारखं बहिष्कारचं धाडसी पाऊल इतर गावांनी उचल तर…
ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आदर्श काम काम कुसळंब ग्रामस्थांनी घेऊन क्रांती घडवण्याचं स्वप्न पाहिल आहे. कुसळंब ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे देऊन निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केला आणि मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच निवडणुकीवर बहिष्कार असल्याचं जाहीर करून क्रांती घडवण्याची ठिणगी टाकली आहे आता उर्वरित गावाने देखील या क्रांतिकारी निर्णयात सहभागी व्हावे अशीच अपेक्षा आहे.
★…तर पाटोदा तालुक्यात क्रांती घडेल!
कुसळंब ग्रामस्थान सारखा इतर ग्रामस्थांनी देखील निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यास पाटोदा तालुक्यात क्रांती घडू शकते आणि मराठा आरक्षणासाठी नागरिक काही पण करू शकतात हे पुन्हा सिद्ध होऊ शकतं. त्यामुळे ज्या ज्या गावांनी फॉर्म भरले आहेत त्यांनी फॉर्म परत घेण्याच्या तारखेपर्यंत विचार करून आपले फॉर्म परत घ्यावेत आणि मराठा आरक्षण मिळेपर्यंत बहिष्कार जाहीर करावा आणि पाटोदा तालुक्यात बहिष्काराची क्रांती घडवावी…
★फक्त ग्रामपंचायतवरच नव्हे तर सर्वच निवडणुकीवर बहिष्कार!
आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेस क्रांती घडली आहे त्या त्या ठिकाणी मराठा समाज पाहायला आता पुन्हा एकदा बहिष्काराची क्रांती घडवण्यासाठी मराठा समाजाला सुवर्णसंधी आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये म्हणजेच सध्या ग्रामपंचायत आणि पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकून सरकारला दाखवून देण्याची सुवर्णसंधी आहे. आता विचार करू नका प्रत्येक गावातील नागरिकांनी ठराव घ्यावा आणि सर्व निवडणुकीवर बहिष्कार जाहीर करावा आणि बहिष्कारच्या क्रांतीचा धागा बनावा एवढीच अपेक्षा आहे. अशीच संधी पुन्हा नाही.