जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत कुसळंब ग्रामस्थांचा सर्व निवडणुकीवर बहिष्कार !
★बीड जिल्ह्यातील कुसळंब गावच्या ग्रामस्थांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!
कुसळंब | सचिन पवार
मराठा आरक्षणाचा मुद्दा गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. गल्लीतील कार्यकर्त्यापासून दिल्लीतील मोठे नेते पूर्णपणे हादरले आहेत आता मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही या टप्प्यावर येऊन थांबले आहेत. याच अनुषंगाने मराठा आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करण्यासाठी अनेक विद्वान नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे इलेक्शन लावून मराठा आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करण्याचा कूटनीती पद्धतीचा डावखेडा आहे परंतु त्याला सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांनी जी मानलं नाही बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कुसळंब गाव येथील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक जाहीर झाली होती परंतु ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे तर उपसरपंच व सर्व सदस्यांनी सामूहिक राजीनामे देत मराठा आरक्षणाचा निकाल निघेपर्यंत आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे असं जाहीर केले आहे.
बीड जिल्ह्यातील जिल्ह्यातील कुसळम गावच्या ग्रामस्थांनी घेतला सर्वात मोठा निर्णय. नो मराठा आरक्षण नो इलेक्शन म्हणत म्हणत विद्यमान सर्व ग्रामपंचायत उपसरपंच सदस्यांनी सामूहिक राजीनामे देत जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इलेक्शन होणार नाही त्याचबरोबर सध्याच्या विद्यमान सर्व सदस्य उपसरपंचांनी राजीनामे देऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गावामध्ये कोणतीही निवडणूक होणार नाही असं सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन जाहीर केले आहे बीड जिल्ह्यातील ही पहिलीच आणि सर्वात मोठी घटना आहे आता तरी सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा अन्यथा येणाऱ्या काळात कोणतीच निवडणूक होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.
★नो मराठा आरक्षण नो इलेक्शन
कुसळंब गावाने घेतला सर्वात मोठा निर्णय ग्रामसभेत ठराव घेऊन येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकत उपसरपंच सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नो मराठा आरक्षण नो इलेक्शन अशी घोषणाच केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा मगच निवडणुका घ्या अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार असल्याचं कुसळंब ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन जाहीर केले आहे.
★आता फक्त निवडणुकीवर बहिष्कार येणाऱ्या काळात नेत्यांवरच बहिष्कार
मराठा आरक्षणाचा मुद्दा अति जिव्हाळ्याचा झाला असला तरी सरकारला मात्र अजिबात गांभीर्य नाही. मराठा आरक्षणासाठी अनेक युवकांनी बलिदान दिले आहे तरी देखील सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करण्यासाठी निवडणुकीचा मुद्दा पुढे केला आहे परंतु मराठा समाजाने देखील निवडणुकीवर बहिष्कार टाकत सरकारला इशारा दिली आहे. येणाऱ्या काळात सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांवर बहिष्कार टाकला जाईल असा देखील इशारा मराठा समाजाकडून दिला जात आहे.