17.9 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

वा रे गुत्तेदार वा रे प्रशासन

कुसळंब-वांजरा फाटा रस्ता म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी !

★त्याच त्याच खड्ड्यात किती वेळेस खड्डे बुजवण्याचे काम करणार ; कमालच आहे बुवा!

कुसळंब | सचिन पवार

कोट्यावधी रुपये खर्च करून वांजरा फाटा – कुसळंब रस्ता तयार करण्यात आला. पण एकाच महिन्याच्या आत त्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडल्याने कामावर, गुत्तेदारावर आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून या रस्त्याच्या तक्रारी सुद्धा प्रशासनापर्यंत गेल्या आहेत परंतु प्रशासनाकडून याबाबत कसलीच खबरदारी न घेता बोगसगिरीने काम करून देण्याची मुबाच दिली आहे असं म्हटलं तर वावगं वाटायला नको. सहा महिन्यात त्याच त्याच खड्ड्यात खड्डे बुजवून गुत्तेदाराने कमालच केली आहे. प्रशासनाने डोळे झाक करून त्यापेक्षा जास्त कमाल केली आहे. त्यापेक्षा जास्त जनतेने डोळ्या झाकून झोपेचं सोंग घेऊन अधिकच कमाल केली आहे.
कुसळंब – वांजरा फाटा रस्त्याच्या कामात बोगसगिरी झाल्याचे दिसून देखील प्रशासनाने कसलीच कारवाई केली नाही. वर्तमानपत्राच्या माध्यमातून वांजरा फाटा कुसळंब रस्त्याच्या प्रश्नावर आवाज नेहमीच उठवला आहे, परंतु प्रशासनाकडून, गुत्तेदाराकडून त्याला केराची टोपली मिळाली आहे परंतु आता गुत्तेदार, प्रशासनाला खूपच महागात पडेल असं पाऊल उचलले जाणार असल्याचा सुद्धा बोलले जात आहे. जिल्हाधिकारी ते थेट आता हायकोर्टामध्ये धाव घेण्यासाठी पत्रकारच सरसावले आहे. सर्व पुराव्यासह पत्रकारच घेणार आता हायकोर्टामध्ये धाव. जोपर्यंत वांजरा फाटा – कुसळंब रस्त्यावर पुन्हा एक नव्याने हॉट मिक्स लेयर होत नाही तोपर्यंत आता माघार घेणार नाहीत असा निर्णय झाल्याचं कळत आहे. संबंधित गुत्तेदार आणि प्रशासनाने यावर विचार करावा अन्यथा पुन्हा हायकोर्टा शिवाय पर्याय नाही तत्पूर्वी एवढेच सूचना वर्तमानपत्राच्या माध्यमातून संबंधितांना देण्यात येत आहे.

★पत्रकारच घेणार हायकोर्टात धाव!

कुसळंब – वांजरा फाटा रस्त्याच्या बोगस कामाबद्दल पत्रकारच हायकोर्टामध्ये धाव घेणार असल्याचं बोललं जात आहे. वांजरा फाटा – कुसळंब रस्त्यावर आता नव्याने हॉट मिक्सचा एक लेयर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाहीत आणि जर तो लियर नव्याने नाही झाला तर संबंधित जे असतील त्यांना हायकोर्टाची पायरी चढावी लागणार यात तीळ मात्र शंका नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!