भगवान भक्तीगड दसरा मेळाव्यासाठी सज्ज ; प्रतीक्षा पंकजा मुंडेंच्या आगमनाची
★दसरा मेळाव्यासाठी चोख बंदोबस्त, स्वच्छता, उत्कृष्ट नियोजन सर्व व्यवस्था – संदेश सानप
कुसळंब | सचिन पवार

पाटोदा तालुक्यामध्ये अठ्ठेगाव पुठ्यातील भगवान भक्तीगड महाराष्ट्राच्या नकाशावर झळकत आहे. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा अगदी जवळ येऊन ठेपला आहे त्याची भगवान भक्ती गड येथे जोरदार तयारी सुरू आहे. पाटोदा तालुक्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट म्हणजेच भगवान भक्ती गड या ठिकाणी 24 ऑक्टोबर रोजी हात दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या मेळाव्यासाठी सावरगाव घाट ग्रामस्थांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मूर्ती स्थळ तसेच मैदानाची स्वच्छता देखील ग्रामस्थांनी केली आहे त्याचप्रमाणे यंदा या मेळाव्यासाठी पाच लाखाच्यावर मुंडे समर्थक येण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडे यांच्या स्वागताची देखील ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली आहे गुढी उभारून यांना मुंडे भगिनींचे स्वागत केले जाणार असून मुक्कामी भाविक भक्तांसाठी भोजनाची देखील व्यवस्था केली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंकजा मुंडे या हेलिकॉप्टर द्वारे भगवान भक्ती गड या ठिकाणी मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी साधारणता सकाळी अकरा वाजेपर्यंत दाखल होतील असा अंदाज आहे. त्यांचं हेलिकॉप्टर कानिफनाथ मंदिर भागात कार्यक्रम स्थळापासून 400 मीटर अंतरावर हेलीपॅड ची व्यवस्था करण्यात येणार आहे पंकजा मुंडे या ठिकाणी दाखल होतील हेलिपॅड पासून गाडीने सावरगाव घाट येथे येते त्यांच्या स्वागताची देखील योग्य ती जोरदार तयारी करण्यात आली आहे.
★आम्ही स्वागतासाठी सज्ज – संदेश सानप
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या विचाराच्या सोनल उठण्यासाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक जनसागर उचलणार आहे या सर्वांचे स्वागत साठी आम्ही ग्रामस्थ म्हणून पूर्ण तयारी केली आहे यंदाचा मेळावा अत्यंत भव्य दिव्य होईल त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झालेली आहे प्रशासनाचेही पूर्णपणे सहकार्य असून सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत आरोग्य पथक व ॲम्बुलन्स देखील ठेवण्यात आली आहे.
– संदेश सानप
सरपंच तथा अध्यक्ष श्री संत भगवान बाबा ट्रस्ट.
★सुरक्षेचा पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा
भगवान भक्ती गड येथे लोकनेते पंकजा मुंडे यांचा भव्य दिव्य असा दसरा मेळावा संपन्न होणार आहे त्या दृष्टीने त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत योग्य ती जबाबदारी प्रशासनाने घेतलेली दिसत असून त्यांच्याकडून योग्य तो आढावा घेतला जात आहे नुकत्याच शिवशक्ती परिक्रमा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्या धर्तीवर मोठ्या संख्येने मुंडे भक्त श्री क्षेत्र भगवान भक्ती गड येथे जमतील असा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षा बाबत खबरदारी घेतली जात आहे लाखोंच्या संख्येने मुंडे समर्थक पंकजा मुंडे यांना ऐकण्यासाठी भगवान भक्ती गडावर येणार असल्याने पोलीस प्रशासनाने देखील चूक बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे.



