दुतोंडी नारायण राणे
नारायण राणे यांच्या समितीनं राज्यातील पुरावे गोळा करून व तज्ज्ञांशी विचारविनिमय करून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राणे समितीचा अहवाल सादर केला होता. त्यातील शिफारस पुढीलप्रमाणे होती.
“मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे, त्या प्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,” अशी शिफारस राणे समितीच्या अहवालात करण्यात आली होती. आज मात्र तेच नारायण राणे मराठा व कुणबी जाती बाबत संभ्रम निर्माण करून मराठा आरक्षणात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच राणे यांनी दिलेली आजची स्टेटमेंट ही शासनास सहाय्य करणारी व मराठा आंदोलनात फुट पाडणारी आहे. त्यामुळे नारायण राणेंनी सर्वसामान्य मराठ्यांच्या मागणी व आंदोलनाबाबत भाष्य करून स्वतःची बौध्दिक कुवत दाखवू नये.कोणी कितीही बोंबलले तरीही मराठे आता कुणाला ऐकणार नाहीत. त्यामुळे राणेंनी शांत बसून आपली उरलीसुरली इज्जत सांभाळावी. तसेच कुणबी तत्सम जात म्हणूनच मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळू शकते व ते आरक्षण घेतल्या शिवाय मराठे गप्प बसणार नाहीत.



