आधी मराठा आरक्षणाचा निर्णय ; मगच मुस्लिम समाज घेणार निर्णय!
पाटोद्यातील मुस्लिम समाजाकडून महत्त्वाचा निर्णय !
पाटोदा | सचिन पवार
महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना इतर समाजाने आंदोलन करणे म्हणजे राजकारण्यांच्या हिताचे ठरणारं असू शकतं याच भावनेतून पाटोदा तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून पुकारण्यात आलेलं आरक्षणासाठीच आंदोलन जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही किंवा त्यांचा निकाल निघत नाही तोपर्यंत मुस्लिम समाज आंदोलन करणार नाही असा एकमुखी पाटोदा तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून निर्णय घेण्यात आला आहे त्याचं मराठा समाजाकडून स्वागत केला आहे.
आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचं या म्हणीप्रमाणे पाटोदा तालुक्यातील मुस्लिम बांधवांना देखील आपल्या मोठ्या भावाचं म्हणजेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत मुस्लिम समाजाकडून आरक्षणासाठी कसलंच आंदोलन करण्यात येणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्यावर 20 ऑक्टोबरला आंदोलन करणार होते परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय निर्णयाक टप्प्यावर येऊन ठेपल्याने त्या मुद्द्यापासून सरकारचं लक्ष विचलित होऊ नये यासाठी पाटोदा तालुक्यातील मुस्लिम बांधवांना आपले आंदोलन होणार नसल्याचे जाहीर केले आहे फक्त पाच मुलींचे हस्ते निवेदन देऊन समाजाच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल पाटोदा तालुक्यातील मराठा बांधवांकडून सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत करण्यात आले आहे.
★आधी आरक्षण मराठ्यांना मगच…
आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं… याप्रमाणे मुस्लिम बांधवांनी देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधी आरक्षण मराठ्यांना मगच आमच्या मागणीसाठी आंदोलन करू असा महत्त्वाचा निर्णय पाटोदा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी घेतल्याने सर्व स्तरातून पाटोदा तालुक्यातील मुस्लिम बांधवांचे अभिनंदन व निर्णयाचे स्वागत केले आहे.
★मराठा समाजाच्या आंदोलनाला अरथळा नको म्हणून मुस्लिम समाजाचे दोन पाऊल मागे!
पाटोदा तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून नेहमीच मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतली आहे, त्यामुळे आता मुस्लिम बांधवांनी पुकारलेलं आंदोलन सुद्धा पाटोदा तालुक्यातील मुस्लिम बांधवांना स्थगित करून मराठा समाजाला आरक्षण वेळेपर्यंत आपण आपला लढा उभारायचा नाही असा एकमुखी निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपला लढा आपण सुरू करायचा नाही असा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आल्याने त्यांच्या लढ्याला आपल्यामुळे अडथळा निर्माण होऊ नये हे लक्षात घेऊन पाटोदा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.
★पाटोद्याच्या मुस्लिम बांधवांचे मराठा योद्धा मनोज जरांगेंकडून स्वागत
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये पाटोदा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी वेळोवेळी सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला आहे. आता मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यावर आल्याने आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला अडथळा निर्माण होईल असं कोणतंही पाऊल उचलायचं नाही त्यामुळे 20 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यामध्ये पुकारलेलं मुस्लिम समाजाचे आंदोलन हे पाटोदा तालुक्यामध्ये होणार नसून फक्त औपचारिक स्वरूपात पाच मुलींचे हस्ते तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन सहभाग नोंदवणार आहेत या निर्णयाचं मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी भ्रमणध्वनी वरून सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत केले आहे.