6.2 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

युवकांनी ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहावे – राजेंद्र मस्के

महाराष्ट्रात ग्रामीण स्तरावर 500 कौशल्य विकास केंद्र मंजूर!

बीड | प्रतिनिधी

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील कुशल भारत घडविण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रात ग्रामीण स्तरावर 500 कौशल्य विकास केंद्र मंजूर झाली असून, दि. 19 ऑक्टोंबर गुरुवार रोजी जिल्ह्यातील 17 कौशल्य केंद्राचा ऑनलाईन शुभारंभ संपन्न होत आहे. या महत्वपूर्ण योजना शुभारंभ प्रसंगी युवकांनी बहुसंखेने सहभागी व्हावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील युवक- युवतींना रोजगार क्षेत्रातील उपयुक्त कौशल्य आत्मसात करून तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या या ग्रामीण स्तरावरील कौशल्य विकास केद्रांचे ऑनलाईन उद्घाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते दिनांक 19.10.2023 रोजी संध्याकाळी 4.00 वाजता संपन्न होत आहे.

★जिल्ह्यातील 17 केंद्रावर जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम

हा कार्यक्रम “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर संपन्न होणार आहे. आपल्या जिल्ह्यातील 17 केंद्रावर जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. रोजगार क्षेत्रातील संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमास आपल्या नजीकच्या केंद्रावर अथवा ऑनलाईन पद्धतीने उपस्थित व्हावे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!