12.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

सरपंच संगीता पोपट गोंडेंच्या पदावर अतिक्रमणाची टांगती तलवार ?

[ भ्रष्टाचार, अतिक्रमण, अनियमित्ता याचे केंद्रबिंदू म्हणजेच सरपंच गोंडे की काय ?- सर्वसामान्य जनतेकडून प्रश्न ]

★सरपंच संगीता पोपट गोंडे यांच्या अतिक्रमणाचा उतारा जिल्हाधिकाऱ्याच्या दारात ; तारखा सुरू झाल्याने सरपंचांची मनस्थिती ढासाळी!

आष्टी | प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील जळगाव कडा कारखाना येथील ग्रामपंचायतचे सरपंच गोंडे यांच्यावर बोगस कामे व अतिक्रमण केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य नागरिकांनी केल्यामुळे सरपंच गोंडे यांनी तक्रारदारावरच अतिक्रमानाचे आरोप करत कारवाई करण्याची मागणी करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असंच म्हणावं लागेल. सरपंच गोंडे यांनी कित्येक जमीन सह स्वतःचा बंगला सुद्धा गायरान जमिनीवर करून अतिक्रमण केल्याचे स्पष्ट आहे. सरपंच विरुद्ध तक्रारी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी असल्याने त्यांच्या तारखा सुरू झाल्याने सरपंच गोंडे यांनी विरोधकांवर अतिक्रमणाचे आरोप करत आरोप केले आहेत असं ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी म्हटले आहे.

कडा कारखाना जळगाव ग्रामपंचायतचे सरपंच गोंडे यांनी स्वतः अतिक्रमणाची जमीन ताब्यात घेत त्या ठिकाणी स्वतःचे घर उभारलं, हॉटेल व्यवसाय सुरू केला असून उर्वरित जमिनीवर ते पीक घेत आहेत या संदर्भात सध्याचे ग्रामपंचायत सदस्य व गावातील काही नागरिकांनी सरपंच गोंडे यांचे पद रिक्त करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सरपंच गोंडे यांनी ज्या नागरिकांनी, सदस्यांनी तसेच माजी सरपंच व सदस्यांनी तक्रारी दिल्या आहेत त्यांच्यावरच अतिक्रमणाचे आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आरोपाला नागरिकांकडून केराची टोकरी मिळाली आहे. प्रशासनाकडून सरपंच गोंडे यांच्या अतिक्रमण संदर्भात कारवाई करण्यासाठी तारखा सुरू आहेत. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल याची सरपंच यांनी नोंद घ्यावी अशी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांकडून माहिती देण्यात आली आहे.

★सरपंच संगीता पोपट गोंडे यांचं भलं मोठं अतिक्रमण कारवाई मात्र दुसऱ्यावर करण्याची मागणी

जळगावचे सरपंच संगीता गोंडे यांनी स्वतःच भलं मोठ अतिक्रमण करून त्या जागेत स्वतःचे घरदार शेती करत तसेच हॉटेल व्यवसाय देखील सुरू आहे. सरपंच गोंडे यांच सरपंच पद रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतल्याचा राग मनात धरून त्यांनी काही माजी सदस्य व सरपंच यांच्यावर अतिक्रमणाचे आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्वतःचं पद धोक्यात येत असल्याचं दिसताक्षणी दुसऱ्याकडे बोट दाखवत स्वतः स्वच्छ असल्याचा दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न केला आहे परंतु प्रशासन योग्य तो निर्णय घेण्यात तीळ मात्र शंका नाही.

★भ्रष्टाचार, अतिक्रमण, अनियमित्ता म्हणजे सरपंच संगीता पोपट गोंडे की काय ?

जळगाव ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्टाचार अतिक्रमण अनियमेतता असले प्रकार सरसपणे सुरू आहेत. खास करून सरपंच संगीता गोंडे यांचं भलं मोठं अतिक्रमण असताना सुद्धा त्यांनी इतरांवर अतिक्रमानाचे आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली आहे हे म्हणजे असं झालय स्वतःचा बबड्या आणि दुसऱ्याच कार्ट अशी परिस्थिती झाली आहे.

★सरपंच संगीता पोपट गोंडे यांच्या बोगस सह्या करून प्रशासनाची फसवणूक करत गाठला बोगसगिरीचा कळस!

सरपंच हा गावचा कारभारी आणि सेवक असतो मात्र हेच सेवक जेव्हा प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत फसवणूक करतात आणि बोगसगिरीतून पैसा कमवत शासनाच्या जनतेच्या पैशावर मोजमाजा करतात त्यांनाही कोणीतरी सवाशेर भेटत असतो हे ते विसरतात. जळगाव चे सरपंच संगीता पोपट गोंडे यांच्या बोगस सह्या करून प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत जळगाव ग्रामपंचायत अंतर्गत चांगलीच बोगसगिरी सुरू असल्याचा दिसून येत आहे. गावातील नागरिक सदस्यांनी आक्रमक होत त्यांच्याविरुद्ध जिल्हाअधिकार्‍याकडे धाव सुद्धा घेतल्या त्यामुळे लवकरच आता योग्य तो निर्णय होईल यात शंका नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!