★कुसळंब-वांजरा फाटा रस्ता फक्त डागडुजी करण्यासाठीच केलाय की काय ?
★सहा महिन्यात सहा वेळेस डागडुजी तेही त्याच त्याच खड्ड्याची ; बोगसगिरी ची हद्दच पार!
कुसळंब | सचिन पवार
कुसळंब वांजरा फाटा हा रस्ता कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात आला परंतु एकाच महिन्यात खड्डे पडल्याने त्याची डागडुजी सुरू झाली अन आणि दुसरा महिना सुरू झाला परत पावसाने तेच खड्डे उघडले मग काय पुन्हा डागडुजी सुरू झाली परत तिसरा चौथा पाचवा महिना सुरू झाला आणि तीच परिस्थिती तेच खड्डे आणि तीच डागडुजी आता सहावा महिना सुरू आहे तेच खड्डे पुन्हा डागडुजी सुरू बोगसगिरीचे हद्दच केली की राव.. इतक बोगस काम आतापर्यंत कुणी पाहिलं नसावं.. कुसळंब वांजरा फाटा रस्त्याचे काम करणाऱ्या बोगस गुत्तेदाराला इतर रस्त्यांचे कामे देऊन शासनाने स्वतःला आणि जनतेला फसू नये अशी जनतेतून मागणी होत आहे.
पाटोदा तालुक्यातील अठ्ठेगाव पुठ्ठ्याला जोडणारा कुसळंब-वांजरा फाटा-पिंपळवंडी हा रस्ता अतिशय बोगस पद्धतीने झाला आहे. या रस्त्याकडे प्रशासनाचे नेत्यांचं अजिबात लक्ष नसल्याच्या तक्रारी सुद्धा जनतेमधून पुढे येत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून सहा महिन्यात सहा वेळेस डागडुजी केल्यासारखं काम केलं आहे. पाऊस पडला की खड्डे सुरू पाऊस पडला की खड्डे सुरू अशी परिस्थिती कुसळंब वांजरा फाटा रस्त्याची झाली आहे. नेमकं हा रस्ता झाला आहे का डागडुजीसाठी मंजूर करून घेतला आहे हाच प्रश्न जनतेला पडला आहे.
★कोट्यावधीच्या रस्त्याची सहा महिन्यात सहा वेळा डागडुजी ?
कुसळंब – वांजरा फाटा रस्ता कोट्यवधी रुपये खर्च मंजूर केला परंतु एक महिना झाला की डागडुजी एक महिना झाला की डागडुजी अशी परिस्थिती कुसळंब वांजरा फाटा रस्त्याची झाली आहे. मग नेमकं हा रस्ता फक्त तयार केला का ? प्रश्न उपस्थित होत आहे. जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याच सुद्धा बोलले जात आहे, मात्र प्रशासन नेतेमंडळी यावर शब्दही बोलायला तयार नाहीत याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
★थोडी तरी बाळगा रेरेरेरेरे
बोगस काम करण्याची हद्दच केली म्हणा.. कोट्यावधी रुपये देऊन सुद्धा रस्त्याचे बोगस काम होत असेल आणि गुत्तेदार अधिकारी बोगस काम करत असतील प्रशासन डोळे झाक करून पाहत असेल नेतेमंडळी काहीच बोलत नसतील तर याला काय म्हणावं.. शब्दच उरले नाहीत.. वर्तमानपत्रातील बातम्या पाहून तरी गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांना थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी बाळगा रेरेरेरेरे…