महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी 22 तारखेला निवड चाचणी
बीड | प्रतिनिधी
पुणे येथे भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने बीड जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी 22 तारखेला रविवारी जय बजरंगबली युवक व्यायाम मंडळ खोकरमोहा ता शिरूर (कासार )येथे निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे .अशी माहिती महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर संघाचे सचिव पै सईद चाऊस यांनी दिली.
महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खा श्री रामदास भाऊ तडस, हिंदकेसरी सरचिटणीस पै योगेश दोडके कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, आंतरराष्ट्रीय पंच श्री विलास कथुरे व श्री दिनेश गुंड आयोजक श्री प्रदीप दादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली मु पो फुलगाव ता हवेली जी पुणे येथे भव्य आणि दिव्य 66 वी महाराष्ट्र केसरी किताब लढत व राज्य अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे माती व गादी अशा दोन विभागातून या स्पर्धा खेळल्या जाणार आहेत त्यासाठी वजन गट पुढील प्रमाणे आहेत 57,61,65,70,74,79,86,92,97, व महाराष्ट्र केसरी गट हा 86 ते 125 किलो वजन गट असणार आहे .याची मल्लांनी नोंद घ्यावी या चाचणीमध्ये बीड जिल्ह्यातील मल्लांनी आधार कार्ड ओरिजनल व दोन फोटो घेऊन सहभागी व्हावे रविवारी सकाळी मल्लांचे 9 ते 11 या वेळामध्ये वजन होतील गट होतील व प्रत्यक्ष स्पर्धा 12:30 मिनिटांनी सुरू होतील उशिरा येणाऱ्या प्रवेशिकाचा विचार केला जाणार नाही याची मल्लांनी नोंद घ्यावी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे, उपाध्यक्ष पै श्री संभाजी मिसाळ,महाराष्ट्र केसरी पै शिवाजी केकान, कोल्हापूर महापौर केसरी पै.दिगंबर गवळी, पै.श्री.बाळासाहेब शेंदुरकर सर,पै.श्री.शिवशंकर कराड, पै.जमीर पठाण, पै.जालिंदर पोकळे, पै.श्री.नवनाथ भगत (फौजी) तसेच स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी मिसाळ, श्री मदन जाधव सर, माजी जि प सदस्य, श्री शेखर केकान उपमुख्य कार्यकारी अधिकारी, श्री नारायण गुरसाळे समाजसेवक, आदींनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. खोकरमोहा ता शिरूर (कासार) येथील कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीड जिल्ह्यातील मल्लांनी पै सईद चाऊस मो क्र 9850998003,
श्री शिवाजी मिसाळ 9421695555 यांच्याशी संपर्क करावा अशी विनंती करण्यात आलेली आहे.