★मराठ्यांची विराट सभा पाहून सर्वांचीच फाटली ; बरेच जण बरळू लागले
बीड | सचिन पवार
मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथे संपन्न झालेल्या मराठ्यांच्या विराट कोटी मराठा बांधवांच्या जाहीर सभेने बऱ्याच जणांच्या डोळ्यात सल झाली आहे तर अनेक जणांच्या झोपा उडाल्या आहेत. आरक्षणाच्या विराट सभेमुळे बरेच जण हादरले आहेत. छगनजी आणि सदाजी वाटेल त्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन टीका टिपणी करत आहेत. समाजाला भडकवण्याचं काम करत आहेत परंतु मराठा समाजाकडून आव्हान करण्यात आले आहे की या दोन्ही बांडगुळांकडे पाहू नका त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका ते मनस्थिती बिघडल्यासारखं करत असल्याने आपण त्यांच्याकडे लक्ष न देता संयम ठेवून आपला आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवावा आणि संयमान आंदोलन करत राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.
मराठा समाज आता दहा पावले पुढे चालत आहे. फडणवीस आणि त्यांच्या कूटनीतीला मराठा समाजाने चांगलंच ओळखलं आहे. तसेच मराठा समाज सुद्धा गनिमी काव्यात पुढे आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. मराठा समाजाने गनिमी कावा सुरू केला असून छगनजी आणि सदाजी तसेच त्यांचे बोलवते धनी फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे कसलंच लक्ष देऊ नका आपला मुद्दा आरक्षणाचा आहे. आपल्याला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या मुद्द्याकडे लक्षकेंद्रित करा आणि संयमान आंदोलन करत रहा असेच आव्हान करण्यात आले आहे. येणाऱ्या 22 सप्टेंबर पर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट पाहू अन्यथा आपला पुढचा निर्णय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्याला कळतील त्या पद्धतीने आपली पुढील दिशा ठरवली जाईल असे देखील आव्हान सकल मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे.
★मराठे दहा पटीने पुढचा विचार करतात
महाराष्ट्रामध्ये कूटनीती करणाऱ्यांची कमी नाही परंतु गनिमी कावा करणारे मराठे देखील कमी नाहीत. समाजाला पेटवण्याचे काम करणारे अनेक असले तरी मराठा समाजाला शांत करून संयमाची भूमिका ठेवा सांगणारा सुद्धा कोणीतरी आहे. मनोज जरांगे आणि त्यांची टीम संयमाने आंदोलन करत मराठा समाजाला शांत ठेवून आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत गनिमी काव्याचा वापर करायचा आहे असं आवाहन करत आहेत. छगनजी आणि सदाजी यांच्याकडे लक्ष न देता आपल्या महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष द्या असे आव्हान देखील करण्यात येत आहे. मराठ्यांची लढाई दहा पटीने पुढची आणि गनिमी काव्याची असणार आहे.
★मराठ्यांचं आग्या मोहोळ उठल्यावर काय होईल लक्षात ठेवा!
मराठा समाज आग्या मोहोळासारखा आहे. गोड पण आणि झणकेबाज पण त्यामुळे त्यांचा प्रश्न संयमाने सोडवण्यासाठी मराठा समाज संयमाची भूमिका घेत आहे परंतु कोणी दगड मारून त्यामध्ये विस्कळीतपणा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर योग्य उत्तर मिळेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आणि संबंधित व्यक्ती असतील याचीही नोंद ठेवावी.. मराठा समाज कोणाच्या नादाला लागत नाहीत आणि मराठ्यांच्या नादी कुणी लागलं त्याचा योग्य कार्यक्रम झाल्याशिवाय सोडतही नाहीत असा निर्वाणीचा इशारा मराठा समाजामधून सुद्धा देण्यात येत आहे. मराठा समाज शांत आहे. याचा अर्थ कोणीही वेगळा घेऊ नये योग्यवेळ प्रसंगी आक्रमकही होतो हे पण लक्षात ठेवा असा इशारा देखील देण्यात आला आहे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाज अगदी संयमानी भूमिका घेणार आहे. कोणी कितीही डिवाचण्याचा प्रयत्न केला तरी मराठ्यांचा संयम तुटून देणार नाहीत..