12.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू

★मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील अंत्यविधीला उपस्थित

 

गेवराई | प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे काल दि. 14 ऑक्टोबर रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट जाहीर सभा संपन्न झाली. या सभेसाठी पायी गेलेल्या गेवराईतील एका 36 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच जरांगे पाटील हे अंत्यविधीला हजर झाले.

विलास शिवाजीराव पवार (वय 35) असे मयताचे नाव आहे. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे यासाठी 14 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटा येथे जाहीर सभा संपन्न झाली या सभेला राज्याच्या काना कोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या सभेसाठी गेवराई येथील विलास शिवाजीराव पवार हा तरुण शहागड येथून पायी गेला होता. याठिकाणी त्याला जास्त प्रमाणात उलटीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याने छोटा भाऊ गणेश याला कॉल करून माहिती दिली. यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गाड्यांच्या गर्दीने रुग्णालयात पोहचायला उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन मुली असा मोठा परिवार आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पवार परिवाराच्या दुःखात लोकवास्तव परिवार सहभागी आहे.

★समाज तुमच्या पाठीशी, कुटुंब उघड्यावर पडू देणार नाही मनोज जरांगे पाटील

काल झालेल्या सभे दरम्यान उष्मघाताने गेवराई येथील तरुण विलास पवार यांच्या मृत्यूची बातमी रात्री उशिरा कळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अंत्यविधी बाबत माहिती घेऊन सकाळी 11 वाजता गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यविधीला उपस्थित राहिले. यानंतर त्यांनी पवार घरी जाऊन विलास पवार यांच्या पत्नी व तीन मुली व कुटुंबियांची विचारपूस केली. तो फक्त तुमचा मुलगाच नसून माझा भाऊ होता असे समजून त्याला सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, आपला समाज खूप मोठा आहे. या तीन मुलीचे शिक्षण व रक्षण ही समाजाची जबादारी असून आपला समाज तुमच्या कुटुंबियांना कधीच उघड्यावर पडू देणार नाही असे सांगून विलास यांचा छोटा भाऊ, आई, पत्नी व तीन मुलींसह सर्व परिवाराचे सांत्वन करत दुःख व्यक्त केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!