रांगड्या मनोज जरांगेंचं आव्हान !!
मराठ्यांनी केला कोटीचा आकडा पार !!
[ दहा दिवसांत मराठा आरक्षण द्या; अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची – मनोज जरांगे ]
[ छगनजी हे नाही पटलं, गोरगरीब मराठ्यांचे पैसे खाल्ल्याने दोन वर्षे जेलमध्ये फुकटच पिठलं खाल्लं! ]
★आंतरवालीत कोटीच्या गर्दीने फुंकले मराठा आरक्षणाचे रणशिंग!
★छगनजी आणि सदाजी यांच्यावरील मराठा पोरांचे प्रेम काल सभेत पाहायला मिळाले!
★मुंगी तर सोडाच पण सर्वात भित्रा प्राणी ससा देखील विश्वासाने कोटी मराठ्यात बसला!
★अन्यथा 22 ऑक्टोबरला निर्वाणीचा विडा उचलू जरांगेंचा अल्टिमेट
★48 तास हायवे आणि इंटरनेट जाम कष्टकरी कुणब्यांची गावे कुलूप लावून सराटीत
★प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी फडणवीस यांना समाज द्यावी!
आंतरवाली सराटी | सचिन पवार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे झालेल्या विराट संवाद मेळाव्यास राज्यभरातून उपस्थित लाखो मराठा बांधवांच्या गर्दीने इतिहास घडवला. ‘मराठा आरक्षणाचा कायदा 4 दिवसांत होणार नाही हे माहीत आहे. त्यामुळे सरकारच्या मागणीनुसार आम्ही 40 दिवसांचा वेळ दिला. त्यातील 30 दिवस उलटून गेले आहेत. आणखी 10 दिवसच उरले आहेत. या काळात समिती व पुराव्यांचा घाट न घालता सरकारने तातडीने मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त देऊ नये. ते आम्ही घेणार नाही. 24 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेतला नाही तर पुढची जबाबदारी सरकारची राहील. 22 ऑक्टोबर रोजी पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करू. मी टोकाचे उपोषण करणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय इंचही मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी लाखो मराठा बांधवांसमोर व्यक्त केला. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एक तर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा, असा इशारा त्यांनी दिला.
★सर्वात भित्रा प्राणी ससा देखील कोटी मराठ्यात विश्वासाने बसला!
योद्धा मनोज जरांगे त्यांच्या आव्हान नंतर विराट सभेसाठी आलेला मराठ्यांचा महाप्रलय हा अद्भुत आणि विलक्षण होता. या कोटींच्या महासभेमध्ये अचानक सर्वात भित्रा प्राणी म्हणजे ससा आला आणि विश्वासाने बसला देखील. त्या ससामध्ये सुद्धा विश्वास होता की ही मराठ्यांची सभा आहे. इथे मला कसलीच इजा होणार नाही त्यामुळे तर तो विश्वासाने सभा संपेपर्यंत एका जागेवर तळ ठोकून बसला होता. वरून मराठा समाजाचा संयम आणि विश्वास आपल्या लक्षात येत असेलच. मराठा स्वयंसेवक सुरेश शेळके यांनी तो ससा सुखरूप शेजारी असणाऱ्या उसाच्या फळांमध्ये सोडून मराठ्यांचं हळवं रूप दाखवून दिले.
★रांगड्या मनोज जरांगेंच्या विराट सभेला मराठ्यांनी केला कोटींचा आकडा पार!
मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी आपल्या रांगड्या भाषेमुळे मराठा समाजाचे मन जिंकले. मराठ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर बोट ठेवत मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठीचा लढा अधिक तीव्र केल्याने मराठा समाजाने देखील तितकीच भक्कम साथ त्यांना देण्याचं ठरवलं आणि काल 14 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे कोटीच्या वर मराठा समाज एकवटला आणि मनोज जरांगे यांचे हात बळकट करण्याचं विडा उचलला…
★छगनजी व सदाजी यांच्यावरील मराठ्यांचे प्रेम काल पाहायला मिळाले!
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने छगनजी व सदाजी आपली प्रतिक्रिया देऊन मराठा समाजाबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत त्या पक्षात दहा पटीने जास्त प्रेम छगन जी आणि सदाजी यांना मराठा समाजाकडून मिळत आहे याची प्रचिती सोशल मीडियावर तर आलीच असेल परंतु कालच्या कोटी मध्ये जमलेल्या मराठा बांधवांकडून तर चक्क ऐकायलाच मिळाली त्यांच्यापर्यंत मराठा समाजाच्या भावना पोहोचलेच असतील यातील मात्र शंका नाही पण नसतील पोहोचल्या तर नक्की सोशल मीडियावर व्हिडिओ पहावे एवढीच मराठा समाजाकडून अपेक्षा आहे.
★दोन उपमुख्यमंत्री आणि त्यांचे ते दोन येडपट..
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक येडपट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक येडपट खास सांभाळलेले असल्याचं दिसून येत आहे. दोन्ही येडपट काहीही बरळत असून त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही येडपटांना समज द्यावी उगाच मराठ्यांच्या अंगावर येऊ नका असा सल्ला देखील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी सभेतून दिला आहे.
★मराठा योद्धा मनोज जरांगेंच्या भाषणातील ठळक मुद्दे!
अंतरवाली सराटी येथे जमलेल्या कोटी मराठा समाजाच्या समोर मनोज जरांगे यांनी भावना व्यक्त करत मांडले मुद्दे..
» कोपर्डी येथील ताईला न्याय द्या नराधमांना फाशी द्या.
» ओबीसीतील सर्वेक्षण करून प्रगत जातींना बाहेर काढण्यात यावे..
» सारथी योजनेचे सर्व प्रश्न निकाली लावा..
» मराठ्यांना 50% च्या आतूनच आरक्षण द्या मग वेगळा प्रवर्ग करा किंवा कुणबी द्या.
» राहिलेल्या दहा दिवसात मराठा आरक्षण जाहीर करा..
» मोदी शहाण सह केंद्रीय मंत्री मंडळाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे..
» सरकारला शेवटची विनंती दहा दिवसापेक्षा जास्त वाट पाहू शकत नाही.
» मोदी शिंदे यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करावा.
» मराठ्यांना दवचू नका मराठा समाज आग्या मोहोळ सारखा आहे..
» 22 ऑक्टोबर रोजी पुढील दिशा ठरवली जाईल आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही.
» मराठ्यांना रोखणे सोपं नाही तुमचा छाताडावर बसून आरक्षण घेऊ..
» मराठ्यांनो गाफील राहू नका. जाळपोळ करू नका. शांततेत आंदोलन करा. मराठ्यांना आरक्षण दिल्या शिवाय आता मी घराच्या उंबऱ्यालाही शिवणार नाही.
★मराठा चटणी-भाकरी, गुळ-शेंगदाण्यावर ; ही आरक्षणाची धग!
अंतरवाली सराटी येथे कोटींचा वर मराठा समाज एक वाटला होता. या विराट सभेसाठी आलेल्या समाज बांधवांनी स्वतःच्या घरून चटणी भाकरी गुळ शेंगदाणे खाऊन सभा संपन्न केली. मराठ्यातील चार 140 घरे गर्भ श्रीमंत झाले म्हणजे सर्व मराठी श्रीमंत असा जो जाणीवपूर्वक डोंगरात पेटवत गैरसमज निर्माण केला जातो त्यांच्यासाठी आज आंतरवाली सराटी येथील उसळलेल्या मराठ्यांचा जनसागर हा चटणी भाकरी, गुळ शेंगदाण्यावरचा मराठा होता तिथे कोणी आणण्यासाठी पैसे दिले नव्हते वाहनांची व्यवस्था केली नव्हती तर इथं येणारा मराठा हा थोडक्यात भाकर आणि डोळ्यात लेकरांचे भविष्य घेऊन सराटी अंतरवालीत आला होता याची जाणीव सरकारने ठेवून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी हीच अपेक्षा व्यक्त करता येऊ शकते.
★100 रुग्णवाहिका 300 डॉक्टर 10 हजार स्वयंसेवक कार्यरत होते
मराठ्यांच्या ऐतिहासिक सभेसाठी वीस बाय 36 या आकारात स्टेज तयार करण्यात आले होते मनोज जरांगे यांच्या एन्ट्री साठी 600 फुटाचा व्यवस्था करण्यात आली होती सुमारे 250 वर ही भव्य सभा आयोजित केली होती. कोटींचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने 10 हजार स्वयंसेवक कार्यरत होते मैदानात 10 ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली होती याशिवाय 35 कार्डियाक रुग्णवाहिका, शंभर रुग्णवाहिका 300 डॉक्टर, 300 नर्सिंग स्टाफ, अग्निशामक दलाच्या 10 गाड्यांची ही व्यवस्था करण्यात आली होती सभास्थळी 20 एलईडी स्क्रीनही लावण्यात आल्या होत्या.
★गठीत समितीचे काम बंद करा
सध्या मराठा समाजासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या समितीचे काम तात्काळ बंद करा तुमचं आणि आमचं ठरलं होतं की चार दिवसात कायदा होत नाही आता तीस दिवस झाले पाच हजारापेक्षा जास्त कुणब्यांचे पुरावे हाती लागले त्यामुळे आरक्षण जाहीर करा उगाच समितीला फिरायला लावून वेळ वाया घालू नका सगळं समोर असताना इकडे तिकडे पळापळ करू नका असा सुद्धा इशारा मनोज जरांगे यांनी सभेतून दिला.