★कुसळंब ते अंतरवाली सराटी 60 गाड्यांचा ताफा गाव बंद करून निघणार
कुसळंब | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील कुसळंब गाव नेहमीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्त्वाच्या भूमिकेत राहिला आहे. ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे येतो त्या त्या वेळेस कुसळंब गाव आपली भूमिका घेऊन सर्वात पुढे चालताना पाहिले आहे. 14 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या मराठ्यांच्या महा सभेला कुसळंब येथून 60 गाड्या सभेसाठी निघणार आहेत संपूर्ण गाव बंद ठेवून सगळीकडे संपूर्ण गावात निघणार आहे.
कुसळंबाचे मराठी नेहमीच आरक्षणाच्या मुद्दा असेल किंवा कोणताही मुद्दा असेल त्या ठिकाणी सर्वात पुढे आपण आजपर्यंत पाहिला आहे आता आरक्षणाचा मुद्द्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका कुसळंबाच्या मराठ्यांनी दुसऱ्यांना आदर्श निर्माण होईल अशी घेतली आहे. संपूर्ण गाव बंद ठेवून 14 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे साठ गाड्या घेऊन सभेला स्वखर्चाने येणार आहेत. पण ही सर्वांनी या आणि मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवण्याच्या क्षणाचे साक्षीदार व्हा असं आव्हान कुसळंबाच्या मराठ्यांकडून करण्यात आले आहे.
★कुसळंब गाव बंद अन् 60 गाड्यांचा ताफा!
पाटोदा तालुक्यातील कुसळंब हे सामाजिक राजकीय आणि धार्मिक प्रश्नावर सर्वात पुढे राहिले आहे आज मराठ्यांचा हक्काचा आरक्षण मिळवण्यासाठी कुसळंबच्या मराठ्यांनी संपूर्ण गाव बंद ठेवून साठ गाड्या सह अंतरवाली सराटी गाठण्याचा संकल्प केला आहे. आता मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे त्याचे साक्षीदार होण्यासाठी हा संकल्प केला आहे.
★आम्ही येतोय तुम्ही पण या…
सकल मराठा समाजाला कुसळंबच्या मराठा समाजाकडून आव्हान करण्यात आले आहे आम्ही आमचं गाव बंद करून साठ गाड्या घेऊन अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या मराठ्यांच्या महासभेसाठी येत आहोत तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन करण्यात आले आहे. मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण आता आपल्याला मिळणार आहे त्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे त्यामुळे सर्वांनीच या सेवेसाठी मोठ्या संख्येने येण्याचं आव्हान देखील करण्यात येत आहे.