मराठा युवकांना संदेश!
मराठा युवकांनो तुम्ही उचला कामाचा वाटा !
चौदा तारखेला अंतरवाली सराटी गाव गाठा!
अंतरवालीला येताना शिस्त तुम्ही पाळा!
रस्त्यांनी येताजाताना गैरवर्तन मात्र टाळा!
आपआपल्या गाडीला भगवे झेंडे लावा!
आपली शिस्त जगाला आता दावा !
लवकर निघून वाटेत खा चटणी भाकरी !
सभेच्या ठिकाणी करा मावळा म्हणून चाकरी !
सभेच्या ठिकाणी निघतील घामाच्या धारा!
तुम्ही द्या ओबीसीमधून आरक्षणाचा नारा!
सभेच्या ठिकाणी बसून रहा तुम्ही दक्ष !
मान्यवरांची भाषण ऐका देऊन तुम्ही लक्ष !
सभा संपल्यावर लोकांना बसवा गाडीत!
पोहचावा त्यांना सुखरूप गाव आणि वाडीत !
वाटेत कुठंही धाब्यावर जेवायला नका बसू !
नाहीतर लाईव्ह बातमीच्या हेडलाईनला दिसू !
मीडिया बदनाम करण्यासाठी बसलायं टपून !
प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची आपण जपून !
शिस्त पाहून जगाला वाटला पाहिजे हेवा !
प्रामाणिकपणे सगळ्यांनी करायची आता सेवा !
कवितेतून सांगतो तुम्हाला अजय भाऊ !
आपली एकजूट आता आपण जगाला दाऊ!
(श्री.भराटे सर जि, प,प्रा शाळा वसंतवाडी, ता – पाटोदा जि – बीड)