इशारा
14 ऑक्टोबरला मराठे
सरकारला इशारा देणार,
या विश्वविक्रमी सभेचा
इतिहास नवा होणार.
शिवरायांचे मावळे आम्ही
आता आरक्षणासाठी लढणार,
लोकशाहीच्या मार्गाने पुन्हा
लाखोंच्या संख्येने भिडणार.
मराठा समाज आता
सरसकट झालाय जागा,
घराघरातील माणूस बनलाय
या मराठाक्रांतीचा धागा.
समाजासाठी तयार होता तो
स्वतःच्या बायकोचं कुंकू पुसायला,
या रणझुंजार मराठ्याचा त्याग
अजून कसा पाहिजे दिसायला.
मागे न हटता मिळवू
आरक्षण आमच्या हक्काचे,
गुणवंत राहिले मागे अन्
पुढे गेले कमी टक्क्याचे.
दोनशे एकरावरचं उभं पीक
सभेसाठी टाकलंय उपटून,
आरक्षण नाही दिलं तर
सरकार सुद्धा टाकू आपटून.
गरजवंत मराठे आता
एकमुखी झालेत व्यक्त,
मनोज जरांगे पाटलांचेच
आम्ही आहोत सारे भक्त!
आहोत सारे भक्त!!
कवी :- संजय शेळके, पांढरी
मो.9975228585