मराठ्यांना दसऱ्याच्या सोन्यापेक्षा आरक्षणाच सोन अपेक्षित!
[ मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या विराट सभेला कोटींचा जनसागर उसळणार ]
बीड | सचिन पवार
मराठा आरक्षणाचा घोंगडं भिजत राहिल्याने काही मराठा नेत्यांचे आणि ओबीसी नेत्यांचे राजकारण सुरू आहे आता हेच राजकारण मोडीत काढण्यासाठी सर्वसामान्य मराठ्यांनी मनावर घेतला आहे. 14 सप्टेंबर रोजी मराठ्यांची विराट महासभा अंतरवाली सराटी येथे होत असल्याने त्याची जोरदार तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर दसऱ्या अगोदरच मराठा आरक्षणाच सोनं लुटणार आशा प्रतिक्रिया येत आहेत.
मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत खऱ्या अर्थान आरक्षणाच्या जवळ आणून ठेवला आहे. अनेक वर्षापासून मनोज जरांगे मराठा आरक्षणाचा लढा शक्य होईल त्या पद्धतीने लढत आहेत परंतु सर्वसामान्य मराठ्यांच्या मनातील त्यांनी मुद्द्याला हात घालत ओबीसीतून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा अग्रस्थानी घेतला आणि सरकारच्या आणि काही मराठा आणि ओबीसी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आता तर मराठ्यांना आरक्षण द्यावच लागणार या टप्प्यावर येऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा ठेपला आहे. त्यामुळे येणाऱ्या 14 सप्टेंबर रोजी मराठा समाजाची महा विराट सभा अंतरवाली सराटी येथे होत असल्याने सर्वच मराठा बांधव आपापल्या परीने शक्य होईल त्या पद्धतीने या सभेची जोरदार तयारी करत आहेत की तर सोशल मीडियावर दसऱ्या अगोदरच मराठा आरक्षणाचा सोनं मराठा समाज लुटणार अशा पोस्ट देखील व्हायरल केल्या जात आहेत.
★जसं शक्य होईल तसं मराठे निघाले!
मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या विराट सभेसाठी मराठा समाज जस शक्य होईल तसं येण्यासाठी सज्ज झाले आहेत. अंतरवाली सराटी येथे दीडशे दोनशे एकर वर होणाऱ्या मराठ्यांच्या विराट सभेला कोणी सायकलवर, कोणी मोटरसायकलवर कोणी, मोठ्या गाड्याने तर कोणी बैलगाडीने तर कोणी वेगवेगळ्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने सभेसाठी यायला तयार झाले आहेत. आता ही सभा मराठा आरक्षणाची नांदीच ठरणार आहे, कारण की मराठ्यांनी मनावर घेतल आहे.
★हीच मराठा आरक्षणाची शेवटची सभा!
मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षापासून रेंगाळत पडला आहे. चार-पाच मराठा नेत्यांमुळे तर चार-पाच ओबीसी नेत्यांमुळे सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षणापासून वंचित राहिल्याच्या वेदना सहन कराव्या लागत आहेत आता ह्याच वेदना दूर होण्यासाठी 14 सप्टेंबरला मराठ्यांची विराट सभा होत आहे हीच मराठा आरक्षणाची शेवटची सभा ठरणार आणि मराठ्यांना हक्काचा आरक्षण मिळणार यात तीळ मात्र शंका नाही त्यामुळे लहानापासून थोरापर्यंत सर्वांनीच या सभेसाठी यायचं असं आव्हान केलं जात आहे.
★सोशल मीडियावर सभेचा धुराळा सरकारच्या डोळ्यात गेला!
मराठा आरक्षणाच्या अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सभेसाठी सर्वसामान्य मराठ्यांनी मनावर घेतला आहे सोशल मीडियाचा जोरदार वापर केला जात आहे. सोशल मीडियाची ताकद मराठ्यांनी काबीज केली आहे. हीच सोशल मीडिया मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल यात तीळ मात्र शंका नाही. मराठ्यांचा सोशल मीडियावरील सभेसाठी सुरू झालेला धुराळा सरकारच्या डोळ्यात गेला आहे. आता आरक्षण तर घेणारच अन्यथा सरकारला पायउतार करावा लागणार येणाऱ्या काळात मराठ्यांची ताकद सर्वांनाच कळणार यात तीळ मात्र शंका नाही.
★मराठे निघाले दसऱ्या अगोदरच हक्काच्या आरक्षणाच सोनं लुटण्यासाठी
सर्वसामान्य मराठा समाजाला आजपर्यंत काही मराठा तर काही ओबीसी नेत्यांनी खेळवत ठेवला आहे स्वतःची पोळी भाजण्यासाठी सर्वसामान्य मराठ्यांच्या जीवनाशी खेळत आले आहेत आता सर्वसामान्य मराठ्यांनी ओळखलं असं सर्वसामान्य मराठ्यांनी आरक्षणाचा मुद्दा घेत हाती. आता दसऱ्या अगोदरच मराठा आरक्षणाच सोन मराठे लुटणार यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. आता शेवटची आणि आरक्षणाच सोन स्वतःच्या पदरात पाडण्याची सभा आहे त्यामुळे सर्वांनीच मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथे 14 सप्टेंबर रोजी उपस्थित राहून सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हा असे आवाहन केले जात आहे.