मराठ्यांच्या विराट सभेसाठी आष्टी ते अंतरवाली सराटी अशोक पोकळे यांची सायकल वारी !
आष्टी | सचिन पवार
मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी मराठ्यांच्या भविष्यासाठी आंदोलनाचा शस्त्र बाहेर काढत सर्व मराठा समाजाला एकत्रित करून सरसकट ओबीसीतून 50% च्या आतील कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी पेटवलेलं रान अधिक वनव्यासारखं पेटले आहे. 14 सप्टेंबर रोजी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठ्यांची विराट सभा होणार आहे या सभेसाठी आष्टी तालुक्यातील युवक अशोक पोकळे यांनी सायकल वारी करून सभेला जाण्याचं ठरवलं असून ते सध्या सभेसाठी निघाले आहेत त्यांना प्रत्येक गावातून मानापणाने पुढे पाठवले जात आहे.
आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्याला 14 ऑक्टोबर च्या सभेला आवर्जून उपस्थित राहायचंच आहे.. त्यासाठी चिंचाळा येथील अशोक पोकळे हे 180 किलोमिटर सायकल द्वारे दि. 8 सप्टेंबर रोजी चिंचाळा येथून अशोक पोकळे निघाले आहेत.तुम्ही सुद्धा नक्की या.. मराठा आरक्षण हे 14 तारखेच्या सभेवरूनच ठरणार आहे हे ही लक्षात घ्या 100 एकर वरून 150 एकर जमीन शेतकऱ्यांनी उभ्या पिकासहीत दिली आहे. आपण निदान अंतरवाली सराटी येथिल सभे साठी यावे अशोक पोकळे असे आवाहन सायकल वारी दरम्यान येणाऱ्या प्रतेक गावात करत आहेत.
★सायकल वरून आरक्षणाचं निमंत्रण देत सभेकडे प्रस्थान!
आष्टी तालुक्यातील चिंचाळा गावचे अशोक पोकळे यांनी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या विराट सभेसाठी सायकलवरून जाण्याचा संकल्प केला आहे त्या अगोदर त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन मराठा समाजाला जागृत करत 14 तारखेला होणाऱ्या मराठ्यांच्या विराट सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा आणि आपल्या हक्काचा आरक्षण मिळवून घ्या असे आव्हान देखील केले आहे.