25.5 C
New York
Friday, June 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

जळगावच्या सरपंच, ग्रामसेवकाकडून लाखो रुपयाचा बोगस चुराडा!

★जनतेचा पैसा खाता तरी किती ? जनता सुज्ञ ; योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करेल!

★पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बोगस उलाढाल ; लाखो रुपयांचा अपहार!

★जनतेचा पैसा सरपंच ग्रामसेवकाच्या घशात कसा ? तो पैसा जनतेचा त्यांच्या घशातून जनताच बाहेर काढेल – राम धुमाळ

[ सरपंच व ग्रामसेवक विरोधात सर्व सदस्यासह जनता झाली आक्रमक! ]

आष्टी | प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रामपंचायत जळगाव अंतर्गत 15 व्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून बोगस देयके अदा करून 26 लाख 9 हजार 941 रुपयांचा अपहार करून सरपंच व ग्रामसेवक यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून भ्रष्टाचार करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याने त्याची चौकशी करून जनतेचा पैसा व लोकहिताची कामे दाखवून स्वतःच्या घशात घालणाऱ्या सर्व संबंधितांवर कायदेशीर व तसेच दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जळगाव ग्रामपंचायत च्या सर्व सदस्यांनी केली असून या निवेदनावर सानप अमोल चंद्रकांत, धुमाळ अशा मनोहर, धुमाळ सविता पद्माकर, लोढे कांताबाई केरबा, काळोखे सीमा विजय यांच्यासह यांच्यासह माजी सरपंच राम धुमाळ स्वाक्षरी केल्या आहेत. ते निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे देऊन कठोर कारवाई करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी देखील सरपंच उपसरपंच यांनी अद्यापपर्यंत एकही ग्रामसभा घेतली नाही सदस्यांना विचारात न घेता प्रोसिडिंगवर व ठरावावर सदस्यांच्या खोट्या सह्या करून कामे पारीत केलेली आहेत. चौकशी करुन सदस्यांना न्याय अशी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच जळगांव ग्रामपंचायत अंतर्गत गावच्या विकासासाठी शासनाकडून 15 व्या वित्त आयोगातून रक्कम 26 लाख 9 हजार 941 एवढा रकमेचा निधी ग्रामपंचायत खात्यातून 2023 वर्षांमध्ये खर्च करण्यात आलेला आहे सदर खर्च करण्यात आलेला निधी हा ग्रामपंचायतीच्या आराखड्यानुसार खर्च झालेला नाही तसेच फक्त आणि फक्त कागदपत्रे कामे दाखवून बोगस देयके आधारे निधी खर्च करून हडप करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीप्रमाणे खर्च झालेला निधी हा बोगस कामांची नावे टाकून हितासंबंधी व्यक्ती संबंधित दुकानांचे बोगस देयके लावून सरपंच संगीता पोपट गौंडे व ग्रामसेवक यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून ग्रामपंचायतच्या संबंधित विकासासाठी 15 व्या वित्त आयोगातून आलेला निधी हडप केल्याचे निदर्शनास येत आहे तरी नमूद केलेल्या कामाची देखील अदा केलेल्या यादीनुसार कागदपत्रे निधी बोगसरीत्या खर्च करण्यात आलेला आहे.या कामाची चौकशी करून जळगांवचे सरपंच व ग्रामसेवक यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून निधी हडप व भ्रष्टाचार करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याने त्यांची चौकशी करून जनतेचा पैसा लोक हिताचे कामे दाखवून स्वतःच्या घशात घालणाऱ्या सर्व संबंधितावर दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करुन संबंधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सानप अमोल चंद्रकांत, धुमाळ अशा मनोहर, धुमाळ सविता पद्माकर, लोढे कांताबाई केरबा, काळोखे सीमा विजय यांच्यासह यांच्यासह माजी सरपंच राम धुमाळ यांनी केली आहे.

★प्रशासक काय झोपा काढतय काय ? – राम धुमाळ

जळगांव ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची इंजि.मोरे यांना विचारणा केली असता त्यांनी एम.बी मी भरली नाही असे सांगितले तरी देखील बीले काढली आहेत.खोटी कागदपत्रे सादर करुन ही काही कामांचे बील काढण्यात आली आहेत.या संपूर्ण कामाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई संबंधित अधिका-यांचे निलंबन करावे अन्यथा तीव्र उपोषण करु…
– राम धुमाळ
( मा.सरपंच जळगांव. )

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!