12.9 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

शहीद जवान पांडुरंग तावरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान पांडुरंग तावरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बीड | प्रतिनिधी

 

उत्तर सिक्कीम भागात झालेल्या ढगफुटीत शहीद झालेले बीड जिल्ह्याचे सुपुत्र जवान पांडुरंग वामन तावरे यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी काकडहिरा (तालुका पाटोदा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिक्किम जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीत लष्कराच्या छावणीसह 22 जवान वाहून गेले होते. त्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. यात पश्चिम बंगालमधील जलाईगौरी च्या दक्षिणेकडील सदरपारा येथे त्यांचा मृतदेह सापडला.कृषिमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काल मध्यरात्री काकडहिरा येथे तावरे यांच्या कुटुंबियांचे भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तावरे यांच्या वडील व भावाचे त्यांनी भेट घेतली.शहीद जवान तावरे यांचे पार्थिव पुणे मार्गे आज काकडीहिरा येथे आणण्यात आले. प्रथम गावातील त्यांच्या घरी व नंतर ग्रामपंचायत कार्यालयात ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. जवान तावरे यांच्या पश्चात वडील,आई, भाऊ, पत्नी तसेच दोन मुले असा परिवार आहे.यावेळी शासनातर्फे उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार बालाजी चितळे, पोलीस उपविभागीय अधिकारी धाराशिवकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त करणार शरद पांढरे, कृषीमंत्र्यांचे बंधू अजय मुंडे आदींनी पुष्प चक्र अर्पण केले.यावेळी गट विकास अधिकारी बापूराव राख, काकडीहिरा गावच्या सरपंच सविता जायभाये यांच्यासह सर्वच क्षेत्रातील नागरिक तसेच माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय आदींनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!