मुळपत्रीका!
मराठ्यांनो तुम्हाला नेहमीच
मानाने बोलवावं लागतं
नाहीतर नेहमीच तुमचं
मानापानाच नाट्य रंगतं.
आमंत्रण नाही म्हणून
घरात बसू नका
फुकटचा रुबाब दाखवून
उगाच रुसू नका.
मनोज जरांगे पाटलांनी
मुळपत्रिका पाठवलीय
मराठा कुणबी आरक्षणाची
मशाल त्यांनी पेटवलीय.
गाफील राहिलात मराठ्यांनो
तुमचा घात होईल
हातातोंडाशी आलेला घास
पुन्हा निसटून जाईल!
चौदा ऑक्टोबर तारीख
काळजात कोरून ठेवा
चला अंतरवाली सराटीला
दवंडी पिटवा प्रत्येक गावा!
हीच निमंत्रण पत्रिका आता दोनशे एकर ची जागा भरून काढेल.अन मराठा आरक्षण देण्यास भाग पाडेल!