कोण्या मंत्र्यासंत्र्याच्या स्वागताला नव्हे ; एका सर्वसामान्य मराठ्याच्या स्वागताला रात्रभर लाखोंचा जनसमुदाय!
अन्यथा सरकारची गाठ थेट मराठ्यांशी
[ आष्टी-जामखेड-पाटोदा-बीड पर्यंत लाखो मराठे रात्रभर जागे! ]
★मनोज जरांगे पाटील यांचा आष्टीच्या सभेत खणखणीत इशारा
★अंतरवाली सराटी येथील मराठ्यांची सभा त्यानंतर सरकारने दुसऱ्या दिवशी आरक्षण जाहीर केले पाहिजे
★आष्टीत पासून पाटोदा पर्यंत 100 जेसीबीतून 700 क्विंटल फुलांची उधळण
★लोकवास्तव चे व संपादक सचिन पवार यांचे मनोज जरांगे यांच्याकडून कौतुक!
आष्टी / पाटोदा | सचिन पवार
आपल्याला आता मराठा आरक्षण मिळवायचे असून त्यासाठी आता तुमच्यात फूट पडू देऊ नका. सरकारने आपल्याकडून वेळ घेतला असून सरकारने आता कारण सांगू नये. टिकणारे आरक्षण द्या नसता सरकारची मराठ्यांशी गाठ असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आष्टी येथील मराठा संवाद यात्रेतील सभेत शुक्रवारी दिला. दरम्यान, आष्टी शहरातील जामगाव फाटा ते तलवार नदी राष्ट्रीय मार्गावर तर पाटोद्यापर्यंत जवळपास 100 जेसीबीतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर 700 क्विंटल फुलांची उधळण करत तोफांची सलामी देत अभुतपूर्व स्वागत करण्यात आले.
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा संवाद यात्रेवर असून शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आयोजित सभेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांततेत आंदोलन सुरू होते, पण सरकारला काय झाले काय माहीत त्यांनी आपल्या आई-बहिणीवर हल्ला केला. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. हे आंदोलन आता पेटले, सरसकट मराठे शेतकरी आहेत, पण अर्ध्या मराठ्यांना आरक्षण, अर्ध्या मरठ्यांना आरक्षण नाही, हे बरोबर नाही. सरकारने आम्हाला एक महिन्याचा अवधी मागितला अन् म्हणाले तुम्हाला कायम टिकणारे आरक्षण देतो. सरकारचा असा डाव होता आपण वेळ देणार नाही. पण मी त्यांचा डाव ओळखला होता. कारण मी पण मराठ्याचे पिल्लू आहे.सरकार मला तीस दिवसांचा वेळ मागत होते. आपण त्यांना चाळीस दिवस दिले. आता सरकारला वेळ पाहिजे होता तो दिला. आता सरकारने ठरलेल्या वेळेप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण न वळवळ करता द्यावे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आता मराठा कुणबी एक असूनही त्यांना आरक्षण द्या, आपण त्यांचा सौदा मोडून काढला आहे.
★पाटोद्यात 5 ची सभा झाली 11 वाजता तरीही हजारो मराठे
पाटोद्यामध्ये मनोज जरांगे यांची भव्य संवाद यात्रा 5 वाजता होणार होती परंतु नागरिकांचा प्रतिसाद पाहता पाटोद्यामध्ये ती संवाद यात्रा अकरा वाजता पोहोचली तरी देखील हजारो मराठी माता भगिनीसह छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाण मांडून बसले होते त्यांच्या स्वागतासाठी 25-30 मधून 200 क्विंटल फुलांची उधळण करत त्यांचा जंगी स्वागत करण्यात आलं मराठ्यांचा जोश पाहून मनोज जरांगे यांनी देखील वीस-पंचवीस मिनिटे वाढून घेत सभेला अधिक महत्त्व दिले आणि येणाऱ्या 14 तारखेला मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
★मुस्लिम बांधवांकडून पाण्याची व्यवस्था
आष्टी शहरात यापूर्वी असे अभूतपूर्व स्वागत कोणाचेच झाले नाही. सभेसाठी आलेल्या मराठा समाज बांधवांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून अर्धा व एक लिटर सीलबंद पाणी बाटल्यांची सोय आष्टी शहरातील मुस्लिम बांधवांनी केली होती.
★अनेक गावांनी उपोषण करून दिला जरांगेंना पाठिंबा
आष्टी तालुक्यातील घाटा पिंप्री, चिंचाळा, केळसांगवी, चोभा निमगाव, खुंटेफळ, फत्तेवडगाव, दौलावडगाव,बेलगाव,जाम गाव,मांडवा,वाळूंज,तव लवाडी या गावांनी मनोज जरांगे यांच्या आंतरवाली येथे सुरू असलेल्या उपोषणास आपल्या गावात उपोषण करून पाठिंबा दिला होता.
★कुसळंब वांजरा फाटा येथे लोकवास्तवचे संपादक सचिन पवार कडून फीचर भेट!
डिजिटल वर्तमानपत्र लोक वास्तव नेहमीच मराठ्यांच्या लहान सहान गोष्टीवर लक्ष ठेवून वर्तमानपत्राच्या माध्यमातून तितकच महत्त्व देत आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये सहभागी आहे मोठ्यात मोठ्या सभा आणि लहानात लहान सभा लोकवास्तव मध्ये पाहायला वाचायला मिळतात. लोक असतो ते संपादक सचिन पवार यांनी मनोज जरांगे यांच्या वास्तव परिस्थितीवर तयार केलेले फिचर कुसळंब वांजरा फाटा येथे भेट देऊन लेखणीतून स्वागत केले त्यांच्या लेखणीच मनोज जरांगे यांनी देखील कौतुक केले.