14.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

चिंचाळा गावकऱ्यांनी करुन दाखवले ; लोकवर्गणीतून पुल तयार!

  • ★एक मंत्री ,एक खासदार, दोन आमदार असताना सुद्धा चिंचाळा नदीवर झाला नव्हता पुल!

आष्टी | प्रतिनिधी

गावकऱ्यांनी ठरवले तर ते काहीही करु शकतात. अगदी शासनाकडून न होणारी कामे गावकरी करु शकतात. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचाळा गावकऱ्यांनी करुन दाखवले, शासनाचा निधी न घेता केला लोकवर्गणीतून केला पुल तयार एक मंत्री ,एक खासदार, दोन आमदार असताना सुद्धा चिंचाळा नदीवर झाला नव्हता पुल . गावकऱ्यांनीच नदीवरील पूल तयार केला आहे.
चिंचाळा गावकऱ्यांनी करुन दाखवले, शासनाचा निधी न घेता केला पुल तयार केला, राज्यात पावसाळा आला की खड्ड्यांची व नदी वरील पुलांची चर्चा सुरु असते. लोकप्रतिनिधी अन् शासकीय कार्यालयात नागरिक चकरा मारतात. या सर्व प्रयत्नानंतर अनेकवेळा खड्डेमुक्त रस्ते व पुल होत नाहीच. आता बीड जिल्ह्यातील चिंचाळा ग्रामस्थांनी ‘गाव करील ते राव काय करील’, या म्हणीची प्रचिती आणून दिली आहे. गावकऱ्यांनी आपल्या गावात नदीवर पुल तयार केलख आहे. गावकऱ्यांचा हा पॅटर्न आता चांगलाच चर्चेत आला आहे. गावकऱ्यांनी काय केले? ज्यामुळे गावात रस्ते उभे राहिले, त्याची चर्चा होऊ लागली आहे.गेली विस वर्षांपासून चिंचाळा नदीवरील पुलांची समस्या होती त्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा शासकीय कार्यालयाच्या खेट्या मारल्या. अधिकाऱ्यांना चिंचाळा गावातील नदी वरील पुल करण्याच्या संदर्भात निवेदन दिले. परंतु ही समस्या काही सुटली नाही. मग गावकऱ्यांनीच पुढाकर घेतला. काय केले ग्रामस्थांनी
गावातील युवक आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र आले. त्यांनी गावाच्या नदीवरील पूल करण्यासाठी आता शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता काम करण्याचा निर्णय घेतला. गावातील पुल करण्यासाठी निधी जमवण्यास व्हाट शाप गुरुप सुरुवात केली. पाहता, पाहता गावकऱ्यांना चक्क दिड लाखांचा निधी लोकवर्गणीतून जमवला. हा निधी पुल निर्माण करण्यासाठी वापरणे सुरु केले. गावातिल नदीवर पुल लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी उभा केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!