★सार्वजनिक स्वच्छतेतही तिरूमला पॅटर्न ; शहराच्या विविध भागात अभियान
बीड | सचिन पवार
मो.9921801919
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुटे ग्रुपच्या वतीने बीड शहर व परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलेल्या अभियानातही तिरुमला पॅटर्नचे वैशिष्ट्ये जपत अतिशय नियोजनबद्दरित्या इतिहास स्वच्छता करण्यात आली. शहरात तीसहून अधिक टीमच्या मदतीने हे अभियान राबविण्यात आले बीड शहराचे रूपच पलटल्याचे दिसले.
बीड येथून देश विदेशात नावारूपास आलेले कुटे ग्रुपने आपले वेगळेपण जपले आहे. व्यवसायात गरुड झेप घेत असलेल्या या ग्रुपने सामाजिक भानही जपले आहे. बीडसह राज्यभरात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम ग्रुपच्या माध्यमातून राबविले जातात 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त कुटे ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कुटे, एमडी सौ.अर्चनाताई सुरेश कुटे, आर्यन कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ऑक्टोबर रोजी कुटे ग्रुपच्या वतीने बीड शहराच्या बस स्थानकापासून ते पालेपीर, बार्शी नाका, खंडेश्वरी मंदिर, जालना रोड, धोंडीपुरा, सुभाष रोड, मोंढा, हिरालाल चौक, माळीवेस, बशीरगंज, करांजा, शासकीय विश्रामगृह, बालपिर शहेशाहवाली दर्गा, केसके कॉलेज रोड, तुळजाई चौक, राजीव गांधी चौक, अंबिका चौक, कॅनॉल रोड, शासकीय आयटीआय, भक्ती कंट्रक्शन यासह विविध भागात 30 पाठवण्यात आल्या होत्या. हाती झाडू टोपले घेऊन हे स्वयंसेवक भल्या सकाळीच रस्त्यावर उतरले होते. यांच्या मदतीला कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टरची ही व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकाने केलेल्या स्वच्छतेमुळे शहराच्या विविध भागाचे रूपच पलटले आहे. शहराच्या विविध भागात अतिशय नियोजनबद्धरित्या राबवण्यात आलेले या मोहिमेतून कुटे ग्रुपचे पॅटर्न पुन्हा एकदा समोर आले आहे.
★हाती झाडू आणि टोपले!
कुठे ग्रुपच्या माध्यमातून शेकडून स्वयंसेवक रविवारी सकाळीच रस्त्यावर उतरले. हातात झाडू अन् टोपले, तोंडाला मास्क, हॅन्डग्लोज व विशिष्ट ड्रेस कोड असलेले हे स्वच्छता दूत सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा विषय ठरले. या स्वच्छता दूतांनी वेगवेगळ्या परिसरात दाखल होत थेट स्वच्छता मोहिमेला सुरुवात केल्याने दुपारपर्यंत बहुतांश भागातील कचरा थेट शहरा बाहेर पोहोचला होता.
★या मातीशी नाते
कुटे ग्रुप या मातीतून निर्माण झाला आहे, त्यामुळे बीडकरांची योगदान आमच्यासाठी मोठी आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुटे ग्रुपच्या वतीने रविवारी संपूर्ण बीड शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
– अर्चना सुरेश कुटे
मॅनेजिंग डायरेक्टर कुटे ग्रुप.