20.9 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

कुकडीचे पाणी पेटले!

केवळ प्रसिद्धी करून कुकडीचे पाणी सुटत नाही – आ. बाळासाहेब आजबे

★आमदार सुरेश धस व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या कुकडीच्या पाण्यावरून पत्रकबाजी

★आ.धस हे अनुभवी नेते त्यांनी जबाबदारी पूर्वक वक्तव्य करावेत – आ. आजबे

आष्टी | प्रतिनिधी

कुकडी पाण्यासंदर्भात आपण गेल्या एक महिन्यापासून प्रयत्नशील असून याबाबत कुकडी कालवा समितीच्या बैठकीत पिण्याच्या पाण्यासाठी .. ओहर फ्लोचे पाणी सोडण्याबाबत मागणी केली असता समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व इतर सदस्यांनीही तात्काळ मंजुरी देऊन तीन ते चार दिवस पाणी सोडले होते काही तांत्रिक अडचणी मुळे ते बंद झाले होते,संबंधित अधिकारी यांच्याशीही भेटून पाण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते व सीना धरणातून मेहेकरी धरणात पाणी सोडण्यासाठी संबंधीत यंत्रणा गेल्या एक महिन्यापासून काम करत आहे, मग नेमके पाणी येणार त्याच्या एक दिवस अगोदर आपण पत्र देऊन पाणी सोडले अशा पेपरला बातम्या दिल्या,फक्त बातम्या देऊन कुकडीचे पाणी येत नसते.. आपण अनुभवी नेते असल्यामुळे जबाबदारीनेच स्टेटमेंट केले पाहिजे आपल्या अनुभवाचा आष्टी तालुक्याच्या विकासासाठीच उपयोग करावा असा हल्लाबोल आ.बाळासाहेब आजबे यांनी आ.सुरेश धस यांच्यावर केला आहे..
सीना मेहकरी धरणात येणाऱ्या कुकडीच्या पाण्या संदर्भात आ.सुरेश धस यांनी दोन दिवसापूर्वी आपण पत्र देऊन सीना धरणात पाणी आणले अशा बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्या आहेत यावर यावर पत्रकारांशी बोलताना आ.बाळासाहेब आजबे म्हणाले की, 05 सप्टेंबरलाच आपण संबंधित मंत्री व कालवा समितीचे अध्यक्ष यांना पत्र देऊन व स्वतः त्या बैठकीस पुणे येथे उपस्थित राहून कुकडीच्या पाण्यासंदर्भात मागणी केली होती आष्टी तालुक्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आत्ताच कुकडी धरणातून जाणारे वाहून जाणारे वेस्टेज पाणी हे सीना धरणात सोडावे व सीना धरणातून लगेच ते मेहकरी धरणात सोडण्यात यावे याबाबत सविस्तर चर्चा मंत्री महोदय व अधिकाऱ्यांची झाली होती त्यामुळे तात्काळ दोन दिवसातच पुढे कुकडी धरणातून सिना धरणामध्ये पाणी सोडण्यात आले होते परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व काही तांत्रिक अडचणीमुळे चे पाणी बंद झाले त्यानंतर कुकडी चे तीन कालवे ओव्हरफ्लो झाल्याने 30 सप्टेंबर रोजी पाणी सोडण्याचे सुरू झाले परंतु त्याच्या एक दिवस अगोदरच आ.सुरेश धस महोदयांनी 29 तारखेला पाणी सोडण्यात यावे असे पत्र दिले 29 तारखेला सर्व विभागाला सुट्टी होती व 30 तारखेला लगेच पाणी सोडण्यात आले असे शक्य आहे का ?असा सवाल करून आपण अनुभवी नेते आहात स्टेटमेंट करताना तरी सर्व गोष्टी तपासून स्टेटमेंट केले पाहिजे आपण कुकडीचे पाणी सोडण्यासंदर्भात संबंधित विभागाला पत्र दिले असले तरीही काही हरकत नाही चांगल्या कामात आम्ही कधीही आडकाठी आणत नाहीत परंतु पाणी सुटणार हे माहीत असताना आदल्या दिवशी पत्र देणे व आपण दिलेल्या पत्रामुळेच कुकडीचे पाणी सोडण्यात आले असे म्हणणे हे कितपत योग्य आहे ही जनतेची दिशा दिशाभूल नाही का ? असा प्रश्न यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला तर कुकडी पाण्यासंदर्भात आपण गेले एक महिन्यापासून पाठपुरावा करत आहोत त्या संबंधित सर्व पत्र व्यवहार व अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेचे रेकॉर्ड आपल्याकडे आहे परंतु मला जास्त खोलात जायचे नाही चांगल्या कामासाठी आपण कोणालाही आडवे येणार नाहीत त्यांनीही पत्र देऊन प्रयत्न केले असतील त्याबाबतही आमचं काही म्हणणं नाही त्याचबरोबर खुंटेफळ पाईपलाईन कामाबाबतचे टेंडर हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले नसून या 1357 कोटी रुपयांच्या कामाला अगोदर शासनाने मंजुरी दिल्यामुळे ते औरंगाबाद च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीचा सवालच उद्भभवत नाही आपण औरंगाबादच्या बैठकीत मंजूर झाले असे म्हणलो नाही तर 1357 कोटी रुपयांचे या कामाचे टेंडर लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे म्हटलं होतं 1357 कोटी बरोबरच व उर्वरित 700 कोटी रुपये हे मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाले असल्याचे आपण म्हटलो होतो त्याबाबतही विपर्यास करण्यात आलेला आहे येत्या दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीत खुंटेफळ ते शिंपोरा थेट पाईपलाईनचे टेंडर प्रसिद्ध होईल त्याबाबतही आपण संबंधित मंत्री व अधिकारी यांच्याशी संपर्कात आहोत त्या बाबतही मतदारसंघातील सर्वच नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे चांगल्या कामासाठी आपण एकत्र आले पाहिजे असे वारंवार आपण सर्वांनाच आवाहन करत आहे परंतु चांगल्या कामासाठी एकत्र येणे ऐवजी आपण विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही असे मत आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

★ही जनतेची दिशा दिशाभूल नाही का ?

आमदार सुरेश धस महोदयांनी किती तारखेला पत्र दिले पत्र दिले त्या दिवशी विभागाला सुट्टी होती का ? लगेच पत्रामुळे पाणी सुटले का ? किंवा त्यांच्या एका पत्राने पाणी येणे शक्य आहे का ? असे असंख्य प्रश्न आहेत. मी त्या खोलात जाणार नाही परंतु जनतेची किती दिशाभूल करावी याचीही मर्यादा आहे, पण असो जनतेला पाणी मिळावं हीच माझी एक मागणी आहे आणि ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे हे देखील जनतेला माहिती आहे, त्यामुळे मी जास्त खोलात जाणार नाही अशा खोचक टोला लगावत आमदार आजबेंनी टीका प्लस विनंतीपूर्वक सल्लाही दिला आहे असंच म्हणावं लागेल.

★श्रेय कुणीही घ्या जनतेला मात्र पाणी वेळेवर द्या!

आष्टी तालुक्यातील जनता म्हणते आम्हाला माहिती आहे कुणी प्रयत्न केले कोणी नाही पण आम्ही पण त्या खोलात जाणार नाही त्यामुळे श्रेय कुणाला घ्यायचे त्यांनी घ्यावे आम्हाला मात्र वेळेवर पाणी द्यावे असाच आमचा विनंतीपूर्वक सल्ला सर्वांना असेल अशा भावना सर्वसामान्य जनतेमधून पुढे येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!