★मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन निवड
आष्टी | सचिन पवार
सरपंच बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अग्रेसर संघटना म्हणून ख्याती असलेल्या अखिल भारतीय सरपंच महासंघ संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी आष्टी तालुक्यातील किन्ही, भवरवाडी ग्रामपंचायतचे युवा नेतृत्व भरत भवर यांची सामाजिक चळवळ कार्यपद्धती, राजकीय यांची कार्यतत्परता पाहुन संघटनेने जिल्हाध्यक्ष पदी त्यांची निवड केली आहे.निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आष्टी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते किन्ही भवरवाडी ग्रुप ग्रामपंचायत युवा नेतृत्व भरत भवर यांनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी,सरपंचाच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत.गावच्या विकासासाठी ही तत्पर राहून ग्रामस्थांचे आरोग्य, शैक्षणिक,क्रिडा, क्षेत्रासाठी तरुणांसाठी विकासाभिमुख कामे करत आहेत.एक आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व करण्याची क्षमता असल्यामुळे त्यांच्याकडे भारतीय सरपंच महासंघ संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.रहाता (शिर्डी) येथे रविवार दि.१ आॅक्टोंबर रोजी झालेल्या अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय कार्यकारणी मेळाव्यात महाराष्ट्राचे महसुल, दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थिती मध्ये निवडीचे नियुक्ती पत्र देताना, केवलराम बारसे ( राष्ट्रीय उपाध्यक्ष ), विनोद वहाडणे ( राष्ट्रीय प्रभारी ) दत्तात्रय शेटे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)बाळासाहेब जपे पाटील( महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष), दत्तात्रय सोनटक्के(उद्योजक) त्याच बरोबर ह.भ.प. अदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) यांनी पुढील वाटचालीस आशिर्वाद दिले सरपंच भरत भवर यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून सत्कार करुन मित्र परिवाराने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
★सरपंचांच्या न्याय हक्कासाठी लढणार ; गावागावात जाळ निर्माण करणार
अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदाची माझ्यासारख्या तरुणांकडे जबाबदारी सोपावली आहे.संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मी प्रामाणिकपणे संघटनेची कामे पार पाडेल निष्ठेने कार्य करेल, सरपंचांच्या न्याय हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा करु गावगावच्या सरपंचांच्या भेटी घेऊन संघटनेचे जाळे जिल्हाभर मजबूत संघटन करणार आहे.
– भरत भवर
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ,बीड.