वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी जि. प.स.रामदास बडे यांनी दिला पाच लाख रूपयाचा चेक!
शिरूर कासार | प्रतिनिधी
परळी तालूक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर सुडबुध्दीनी कारवाई करण्यात आल्याने संपुर्ण महाराष्ट्रात याचे प्रचंड पडसाद उमटत आहेत तर बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत व अनेक जण मदतसाठी पुढे येत असतांनाच पिंपळनेर जिल्हा परिषद गटाचे अभ्यासू कार्यतत्पर सदस्य रामदास नाना बडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या नावाने पाच लाख रूपयाचा चेक दिला आहे व विरोधकांना चपराक दिली आहे यामधून माजी मंञी पंकजाताई मुंडे व मुंडे कुंटुबियावरती जिल्हा परिषद सदस्य रामदास नाना बडे यांची असलेली आपार निष्ठा दिसून येत आहे.