शिरूरकासार तालुक्याचे जेष्ठ नेते काळाच्या पडद्याआड ; डॉ.रमेशराव पानसंबळ यांचे निधन
शिरूर कासार | जीवन कदम
तालुक्यातील उकांडा च.येथील रहिवासी माजी आमदार कै लिंबाजीराव मुक्ताजी पानसंबळ यांचे जेष्ठ सुपुत्र तथा पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती डॉ रमेशराव लिंबाजी पानसंबळ यांचे सोमवार दि २ रोजी वृध्दपकाळाने निधन झाले डॉ रमेशराव पानसंबळ राजकारणातील धूरंधर जुने अभ्यासू नेते होते. शिरूरकासार तालुका निर्मिती अगोदर ते पाटोदा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती या पदावर अनेक वर्षे होते त्यानंतर जिल्हापरिषद सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय होते. शिरूरच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते ,लोकनेते शरदचंद्रजी पवार यांचेबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते ,बीडला नुकतेच पवार सभेसाठी आले होते त्यावेळी डॉ पानंसबळ यांची भेट घेतली होती .राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते शरद पवार यांचे बरोबरीने पक्षात राहीले होते. डॉ.पानसंबळ यांची राजकारणात स्व.आर आर.पाटील , स्व.विनायकराव मेटे अशा मोठ्या नेत्यांशी अत्यंत जवळीक होती. दिवंगत खासदार केशरबाई क्षिरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यानंतर त्यांनी स्वर्गीय विनायक मेटे यांचे नेतृत्वाखाली शिवसंग्राम मध्ये ते सक्रिय असायचे ,त्यांचे निधनाने राजकिय क्षेत्रात नक्किच पोकळी निर्माण झाली आहे.