★सौताडा ते तहसील कार्यालयावर 4 ऑक्टोबरला बैलगाडी मोर्चा !
★पाटोदा तालुक्यात आरक्षणाची ज्योत अधिक तीव्र होऊ लागली
पाटोदा | सचिन पवार
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणार्थ पाटोदा तालुक्यात अधिक तीव्र स्वरूप घेताना दिसत आहे. सौताडा व परिसरामधील ग्रामस्थांचा बैलगाडी ट्रॅक्टर मोटरसायकलचा भव्य धडक मोर्चा सौताडा ते तहसील कार्यालयावर बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता धडकणार आहे. या धडक मोर्चा मध्ये महिला वयोवृद्ध वारकरी मंडळी आराधी मंडळी तसेच सर्व शेतकरी बांधव युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मराठा आरक्षण आता ओबीसीतूनच मिळणार आणि ते आम्ही घेणार यासाठी म्हणून जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेलं आमरण उपोषण आता आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे जाहीर केल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. पाटोदा तालुक्यातील अनेक गावांनी विविध मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाकडे लक्ष केंद्रित केले आहे. पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील ग्रामस्थांनी आता सौताडा ते तहसील कार्यालय पाटोदा येथे बुधवारी 4 ऑक्टोबर रोजी बैलगाडी ट्रॅक्टर मोटरसायकलचा भव्य धडक मोर्चा काढण्याचं ठरवलं असून यामध्ये सर्वच मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
★मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण
मराठा समाजाला हक्काचे ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी पाटोदा तालुक्यातील अनेक गावांनी विविध माध्यमातून आंदोलन सुरू केलं असून मोर्चे देखील काढले आहेत आता सौताडा ते तहसील कार्यालय पाटोदा येथे भव्य बैलगाडी मोटरसायकल ट्रॅक्टरचा धडक मोर्चा तहसील कार्यालयावर चार ऑक्टोबर रोजी धडकणार आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हा निश्चय करूनच आरक्षणाचा मुद्दा तेवत ठेवला जात आहे.