★खऱ्या गरजूवंत मराठ्यांनी आता आरक्षणाची ज्योत पेटवली!
★14 तारखेच्या मराठा मेळाव्याची जोरदार तयारी आणि संवाद यात्रा सुरू
[ शंभर एकरात मराठ्यांचा वादळ घुमणार ! ]
बीड | सचिन पवार
मराठ्यांचा हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आता मशाल पेटली आहे. मराठ्यांना आरक्षण हे अतिशय जिव्हाळ्याच झाला आहे. मराठ्यांच्या हक्काचा आरक्षण आता मिळवणारच असा विडा म्हणत जरांगे यांनी मराठा समाजाच्या जीवावर उचलला आहे त्याला आता मराठा समाजाकडून देखील तितकाच प्रतिसाद मिळत आहे. सध्या बीड जिल्ह्यातील मराठा सेवा किशोर पिंगळे हे त्यांच्या सोबतीला बीड जिल्ह्याचा वाघ म्हणून खंबीरपणे रात्रंदिवस पायात भिंगरी बांधल्या गत फिरत आहे. राजमुद्रा संघटनेच्या माध्यमातून उभारलेले युवकांचे जाळ आता मराठा आरक्षणासाठी उपयोगी ठरत आहे सर्व मराठा बांधवांना एकत्रित करून मनोज जरांगेंच्या पाठीशी खंबीर उभे राहून या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी साक्षीदार होण्यासाठी करावे असे आव्हान करत आहेत.
बीड जिल्ह्याचा वाघ मराठा सेवक किशोर पिंगळे सध्या मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या खांद्याला खांदा लावून पायाला भिंगरी बांधल्या गत फिरत आहेत. लहान लहान गोष्टीवर लक्ष ठेवत युवकांना अधिक आरक्षणाच्या लढाईमध्ये उभं करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सोशल मीडिया चा पूर्ण वापर करत मराठा सेवा किशोर पिंगळे यांनी तयार केलेल्या राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून युवकांना अधिक प्रोत्साहन देत आरक्षणाच्या लढाईत तुम्हीही सहभागी व्हा आरक्षणाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हा असे आवाहन करत आहेत. सध्या खऱ्या गरजूवंत मराठ्यांनी आता आरक्षणाची ज्योत पेटवली आहे येत्या 14 तारखेच्या मराठा मेळाव्याची जोरदार तयारी सराटी अंतर्वली येथे सुरू आहे त्यानिमित्त संपूर्ण मराठवाड्यात संवाद यात्रा सुरू आहे या यात्रेमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे दिसत आहेत त्या त्या ठिकाणी मराठा सेवक किशोर पिंगळे सुद्धा सोबतीला राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या युवकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आता ही मराठा आरक्षणाची ज्योत आरक्षण मिळाल्यानंतरच शांत होईल यातील मात्र शंका नाही अशा भावना देखील सर्वसामान्य मराठा समाजातून व्यक्त होत आहेत..
★ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने या आरक्षणाच्या लढाईत उतरा – किशोर पिंगळे
मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एक वाटला आहे. सर्वांनाच सर्व गोष्टी शक्य नाही परंतु ज्या ज्या मराठा समाजातील युवकाला नागरिकाला जी गोष्ट शक्य होईल ती गोष्ट तुम्ही करत राहा तीच तुमच्या आरक्षणाची नांदी असेल मग पेपरच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आर्थिक च्या माध्यमातून असेल किंवा तुम्ही उपस्थित राहून तुमचं कर्तव्य तुम्ही पूर्ण करा एवढीच अपेक्षा आहे कारण की प्रत्येकालाच येणे शक्य नसतं किंवा लिहिणे शक्य नसतं किंवा सोशल मीडिया करणे शक्य नसतं परंतु आपल्याकडे जी कला आहे त्याचा पूर्ण पूर्ण नाही वापर मराठा आरक्षणासाठी करा एवढीच अपेक्षा आहे.
– मराठा सेवक किशोर पिंगळे
★कोणाची वाट पाहू नका स्वतः तयार व्हा!
आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी होताना कोणाची वाट पाहू नका ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने स्वतः आरक्षणाच्या लढाईमध्ये सामील व्हा. ही लढाई उज्वल भविष्यासाठी आहे. मुळे या सुवर्णश्चनाचे साक्षीदार आपण होण्यासाठी शक्य असेल त्या पद्धतीने सहभागी होण्याच आव्हान सकल मराठा समाजाकडून केला जात आहे.
★14 तारखेला मराठ्यांचा मेळावा!
येत्या 14 तारखेला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचा महामेळावा होणार आहे. अंतरवाली सराटी येथून मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढायला नवीन सुरुवात होणार आहे. या सुवर्णाक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व मराठा समाजाने मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथे 14 तारखेला उपस्थित राहून आरक्षणाच्या मेळाव्यासाठी साक्षीदार होण्याचा सुद्धा आव्हान केले जात आहे.