★गणेश विसर्जन मिरवणूकित भक्तांसाठी केली नाष्टा व पाण्याची सोय
आष्टी | प्रतिनिधी
जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाने आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाचे काम सुरू असून राजकीय क्षेत्राबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवताना दिसत आहेत आष्टी येथे गणेश विसर्जन मिरवणुकी मध्ये गणेश भक्तांसाठी शनी मंदिर या ठिकाणी नाष्टा व पाण्याची सोय आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली होती या स्तुत्य उपक्रमाचे गणेश भक्त मधून कौतुक करण्यात येत आहे.
आष्टी येथे दरवर्षीप्रमाणे शेवटच्या दिवशी मानाच्या गणपतीची मोठ्या उत्साहात मिरवणूक होते या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने आष्टी शहरातील गणेशभक्त सहभागी होत असतात बारा वाजेपर्यंत मिरवणूक होत असल्याने या ठिकाणी गणेश भक्तांसाठी आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळाच्या वतीने शनी मंदिर चौक परिसरात नाष्टा व पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता. गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेत आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे गणेश भक्तातून कौतुक करण्यात आले, आ बाबासाहेब आजबे काका मित्र मंडळाने या अगोदरही वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम केले आहे कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून अनेक लोकांचे जीव वाचवण्याचे काम केले तर रक्तदान, आरोग्य शिबिर अनेकांना आर्थिक मदत गरजूंना लागणारी वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीला धावून जाणारे सामाजिक बांधिलकी जपणाचे काम आमदार बाळासाहेब आजबे काका मित्रमंडळाचे कार्यकर्ते हे आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यामध्ये जिथे कमी तिथे आम्ही या व्यक्तीप्रमाणे काम करत असल्याचे दिसून येत आहे.यश आजबे यांनी या कार्यक्रमचे उदघाट्न केले या उपक्रमास माजी जी प अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप सुंबरे पत्रकार शरद तळेकर नगरसेवक नाजीम शेख युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले निळकंठ सुंबरे सर त्यांनी भेट दिली तर या उपक्रमामध्ये शहराध्यक्ष दीपक पिसाळ ग्रामपंचायत सदस्य संतोष कदम , अक्षय हळपावत मुद्दासार शेख , शाम रोकडे, अण्णा सुरवासे , गणेश वाघमारे , दिवेश शेट्टी विजय देशमुख मुकेश सायकडं ,समीर जठोत , गोपाळ वर्मा जगन्नाथ वालेकर काशीगीर शिंगारे गणेश धोंडे यांनी परिश्रम घेतले.पत्रकार व व्यापारी, पोलीस कर्मचारी व गणेश मंडळाचे सर्व सदस्य व गणेश भक्त यांनी या प्रसादाचा लाभ घेतला.