★सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रवादीचा राज्य सरचिटणीस रुपेश बेद्रेपाटीलांचा दैदिप्यमान प्रवास!
पुणे | प्रतिनिधी
‘सोळावं वरीस धोक्याचं मानलं जातं; परंतु त्याच 16 आकड्याला अत्यंत मोक्याचे बनवणारे अनेक जन बहाद्दर विविध क्षेत्रात सातत्याने दिसून येतात. आता असाच कर्तुत्वाचा क्षण बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील निरगुडी या छोट्याशा गावातील एका तरुणाचा आहे.
सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय पक्षाच्या राज्य सरचिटणीस पदापर्यंत आपल्या कार्यकर्तृत्वावर आणि प्रचंड ध्येय शक्तीवर केलेला प्रवास.. अक्षरशः थक्क करणारा तितकाच दैदिप्यमान आहे.त्या तरुणाचे नाव आहे रुपेशराजे बेद्रेपाटील! मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याच्या निरगुडी या छोट्याशा गावातील हा तरुण माध्यमिक शिक्षण त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणा वेळीच समाजकारण करता करता राजकारणात प्रवेशित झाला.. वृक्षारोपण स्वच्छता मोहीम सर्वसामान्य जणांचे वाढदिवस अशा गोष्टी करतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून 2007 पासून सुरुवात केली. 14 ऑगस्ट 2007 रोजी पुण्यातील रमण बाग स्कूल येथे रुपेशराजे बेद्रेपाटलांची माननीय अजितदादा पवारांशी पहिली भेट झाली. याच दिवशी कामालाही सुरुवात केली आज तब्बल सुमारे 16 वर्षांनी म्हणजेच 24 सप्टेंबर 2023 रोजी दादांच्या समवेत दिवसभर पिंपरी चिंचवड येथील सुमारे 40 गणेश मंडळांना भेटी देत रात्री एक वाजून 15 मिनिटांनी नवी सांगवी ते जिजाई निवासस्थानापर्यंत आदरणीय दादां समवेत गाडीतून केलेला प्रवासाचा योग.. सांगताना डोळ्यात अश्रू येत होते. दादांची प्रचंड मेहनत जिद्द चिकाटी सर्वसामान्य जोडलेले नाते या घटनांना व्यक्त करताना रुपेशराजे बेद्रेपाटीलांचा कंठ दाटून येत होता. 16 वर्षातील अनेक आठवणी रुपेशराजेंनी दादांनाही संक्षिप्त रूपात मांडल्या.. दादांनी या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला प्रतिसाद देत पाठीवर शाब्बासकीची थाप देत भविष्यातील कार्याला प्रेरणाही दिल्या.. रुपेशराजे बेद्रेपाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय पक्षाचा राज्यपातळीवर प्रदेश सरचिटणीस होण्याचा सन्मान हे निष्ठेचे फळ असल्याचे बोलले जात आहे.