★आदर्श शिक्षक प्रभाकर लाड सर
सौताडा | प्रदिप उबाळे
कुसळंब केंद्रातील सौताडा रामेश्वर जि. प. मा. शाळा सौताडा येथील माध्यमिक विभागाचे शिक्षक प्रभाकर लाड सर . आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्वःताला झोकून देऊन काम करण्याची त्यांची हातोटी, विद्यार्थी पटसंख्या वाढण्याच्या दृष्टीने अध्यापन सर्वंकष करून भविष्य ,शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा आधुनिक काळातील द्रोणाचार्य म्हणून त्यांची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सातारा येथे ख्याती आहे, अत्यंत शिस्तप्रिय ,नियोजन प्रिय तसेच शिक्षकी पेशाला सर्वस्व झोकून देऊन अध्यापण करणारा शिक्षक म्हणजे प्रभाकर लाड सर.शाळेला मिळालेले एक ऋषितुल्य शिक्षक असं म्हटल तरी वावगे ठरणार नाही, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये प्रकृती अस्वस्थ असताना आरोग्य रजा असताना सुद्धा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून लाड सर अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना येऊन अध्यापन करत आहेत.ही गोष्ट पालकांना माहितीही नसेल परंतु शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिमान शिंदे हे शाळेसाठी ग्रामपंचायतीच्या 15% शैक्षणिक निधीतून सीसीटिव्ही कॅमेरे बसवत असताना त्यांना लाड सर क्रीडांगणावर माध्यमिक वर्गाच्या मुलांना इंग्रजी विषय शिकवत असल्याचे दिसले. शाळा सुटल्यानंतर वर्ग घेत असल्याचे पाहून अभिमान शिंदे यांना आनंद वाटला,जर अशाच पद्धतीने जर प्रत्येक शिक्षकाने सर्वस्व झोकून देऊन अध्यापन केले, तर कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय सुद्धा फोल ठरेल असे मत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिमान शिंदे यांनी लोकवास्तवच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.