5.4 C
New York
Saturday, April 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठे भिजले स्वतःच्या हक्कासाठी ; तहसीलवर मराठ्यांचं वादळ!

★पाटोदा तहसीलवर 20 गावांची धडकली भव्य मोटरसायकल रॅली!

★1500 मोटरसायकल रॅलीने पाटोद्यात पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा उसळला !

पाटोदा | सचिन पवार

पाटोदा तालुक्यातील मराठा समाजाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा अधिक तीव्र होताना दिसत आहे पाटोदा तालुक्यातील जवळपास वीस गावांनी दीड हजार मोटरसायकलची रॅली पाटोदा तहसील कार्यालयावर काढून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले आहे. पाटोदा तालुक्यातील गावची गाव मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष विविध आंदोलनाच्या माध्यमातून हीच आरक्षणाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम करत आहेत. पाटोदा तहसील वर वीस गावांनी भव्य मोटरसायकल रॅली काढून मुलींचा हस्ते तहसीलदारांना निवेदन देऊन मराठ्यांच्या भावना व्यक्त केले आहेत. यावेळी अस्मिता मुंडे, राजकन्या कोकाटे, रेवती कदम, अंजली कोकाटे व प्रगती तांबे यांनी आपल्या भाषणातून मराठ्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.
अंतरवाली सराटी येथे मराठ्यांच्या आरक्षणाची ठिणगी मनोज जरांगे यांनी टाकल्यानंतर अख्खा महाराष्ट्र आरक्षणाच्या मुद्द्यावर एकवटला आणि विविध आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू केली आज तगायत अनेक ठिकाणी साखळी आंदोलन सुरू असून मराठा आरक्षणाची ज्योत पेटलेली आहे त्याच पद्धतीने पाटोदा तालुक्यातील प्रत्येक गाव आता आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहे सोनेगाव ग्रामस्थांनी बैलगाडी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले तर सौदाना,वेद्यकिन्ही,बेनसुर, वैजाळा ,पाचेगाव,पांचग्री, मंझरी, ब्राह्मणवाडी,बोडखेवाडी,दासखेड,सोनेगाव,मंगेवाडी,
बामदळवाडा, ढाळेवाडी ,पारगाव घुमरा,नफरवाडी ,अनपटवाडी , गाधनवाडी,पाटोदा शहर इत्यादी गावांनी भव्य मोटरसायकल रॅली काढून तहसीलदारांना निवेदन दिले यावेळी अस्मिता मुंडे, राजकन्या कोकाटे, रेवती कदम, अंजली कोकाटे, प्रगती तांबे यांनी भाषणातून मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या तर मराठासेवक बाबा तिपटे व शिवव्याख्याते संदीप कदम यांनी देखील मराठा समाजाच्या वतीने मनोगत व्यक्त केली तर आलेल्या सर्व मराठा समाजासाठी युवराज जाधव यांच्याकडून चहा नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. या भव्य मोटरसायकल रॅलीमध्ये वीस गावच्या तरुणांनी मोठा सहभाग नोंदवत दीड हजार मोटरसायकल या रॅलीत सहभागी होऊन आता आम्हाला आरक्षणाची गरज असल्याच्या भावना त्यांनी रॅलीतून दाखवून दिले आहेत.

★पाटोद्यात मराठा आरक्षणाची ज्योत फुलली!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाटोदा तालुक्याची नेहमीच मोर्चाची भूमिका राहिली आहे. मग मराठा आरक्षणाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण असेल किंवा आंदोलन असेल प्रत्येक वेळी पाटोदा तालुका आघाडीवर राहिला आहे. मराठा समाजाचे आर्थिक मागासली पण सिद्ध करण्यासाठीच्या अहवालात सुद्धा महत्त्वाची भूमिका पाटोदा तालुक्यातील राहिली आहे. आता मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप देण्याची भूमिका सुद्धा पाठवता तालुक्यातील मराठा समाजाने दिली आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची पेटवलेली ज्योत अधिक तेवत ठेवण्याचे काम पाटोदा तालुक्यातून होताना दिसत आहे.

★मराठा आरक्षणाची लढाई सर्वसामान्य मराठ्यांच्या हाती!

पाटोदा तालुक्यातील सर्वसामान्य मराठा समाजाने आता मराठा आरक्षणाची लढाई स्वतःच्या हाती घेऊन आरक्षणाच्या लढ्यात सर्वांनीच झोपून देण्याचं ठरवलं आहे. पाटोदा तालुक्यातील गावची गाव आता आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटून उठले आहे. तोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन पाटोदा तालुक्यात सुरूच राहतील असा इशारा देखील मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.

★दीड हजार मोटरसायकलच्या रॅलीच्या नाश्त्याची युवराज जाधव यांच्याकडून व्यवस्था!

पाटोदा तालुक्यातील प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवत आहे यावेळेस दीड हजार मोटरसायकलच्या रॅलीत येणाऱ्या प्रत्येकांच्या चहा नाश्त्याची व्यवस्था युवराज जाधव यांच्याकडून करण्यात आली होती. प्रत्येक वेळेस वेगवेगळे व्यक्तीला संधी देऊन हे आंदोलन सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न राहिला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!