★ग्रामसेवक मधुकर बचुटे यांना कायमचे निलंबित करण्याची मागणी
बीड | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील मोजे चुंबळी ग्रामस्थांनी कारले बोगस काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात रणसिंग आता मधुकर बचुटे यांना कायमचे निलंबित करा अन्यथा आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या दारातून हलणार नाहीत असा संकल्प करून नरहरी यादवराव पवळ, रामराव दादाभाऊ गोंदकर, मोहन भानुदास सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी सह्या करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे.
चुंबळी गावची निवडणूक न झाल्याने प्रशासक म्हणून कुलकर्णी साहेब व ग्रामसेवक मधुकर बचुटे हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. परंतु ग्रामस्थांनी त्यांच्यावर अनेक आरोप करत 15 व्या आयोगाचा काय खर्च केला याची गावातील नागरिकांना कोणतीही माहिती नाही त्यांनी कोणत्याही प्रकारची काम न करता लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलाचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याविषयी वारंवार तक्रारी करून देखील कसलीच दखल न घेतल्याने चुंबळीच्या ग्रामस्थांनी ग्रामसेवक मधुकर बचुटे यांना निलंबित करण्यासाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर 26/ 9 /2023 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे याकडे प्रशासन किती गंभीरित्या पाहते हे पहावं लागेल परंतु जोपर्यंत ग्रामसेवक निलंबित होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
★चुंबळी गावावर प्रशासक मात्र अधिकाऱ्यांनी धुवून खाल्लं!
चुंबळी गावच्या निवडणुकांना झाल्याने चुंबळी ग्रामपंचायत कार्यालयावर प्रशासक नेमले आहे यामध्ये मधुकर बचुटे यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत नागरिकांना लुटण्याचे धंदे सुरू केले आहेत मग त्यामध्ये शेतकऱ्यांच्या गट नंबर संदर्भात असेल किंवा नरेगाखाली येणाऱ्या समितीवर मालकी हक्क वापरून गरिबांकडून 20 20 हजार रुपये लाज घेऊन एक दोन गुंठे तीन गुंठे जमीन पी टी आर च्या नकला दिले आहे त्याचबरोबर असे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. एक प्रकारे चुंबळी ग्रामपंचायतला दोन खाण्याचे काम प्रशासकांनीच केला आहे.
★ग्रामसेवक मधुकर बचुटे यांना निलंबित करा अन्यथा…
प्रशासनातीलच लोक गावाला दोन खात असतील तर प्रशासन काय कामाचं असा आरोप करत चुंबळी ग्रामस्थांनी नगर ग्रामसेवक मधुकर बचुटे यांच्यावर गंभीर आरोप करत जिल्हाधिकारी च्या दारात आमरण उपोषण सुरू केले आहे. आता जोपर्यंत ग्रामसेवक मधुकर बचुटे यांना निलंबित केलं जात नाही तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्याचा दार सोडणार नाहीत असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.