★पंडित जवाहरलाल नेहरू ज्युनियर कॉलेजच्या अभिमानात भर !
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी आष्टी येथील पंडीत जवाहरलाल नेहरू ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी सुनिल जालिंदर पोकळे याने कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा – २०३३ कोल्हापूर जिल्हयातील साने गुरुजी विद्यालय कुरुदंड येथे नुकतीच पार पडली. या कुस्ती स्पर्धेत आष्टी येथील पंडीत जवाहरलाल नेहरू ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी सुनिल जालिंदर पोकळे याने 19 वर्ष वयोगट व 92 कि. वजनगट फ्रिस्टाईल मध्ये सहभागी होऊन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
सुनिल जालिंदर पोकळे ला बालपनापासून कुस्तीचे धडे वडील जालींदर पोकळे यांच्याकडून मिळालेले आहेत. सुनिल जालिंदर पोकळे च्या कुस्ती विषयी आकर्षणामुळे त्यांनी त्याला महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सरावासाठी बालाजी कुस्ती संकुलात पाठवले. सईद चाऊस सर यांनी सराव करून घेतला. सुनिल जालिंदर पोकळे ची नुकतीच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या साने गुरुजी विद्यालय कुरुंदवड येथे निवड होऊन त्याने कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल आष्टी तालुक्यातील सर्व कुस्तीप्रेमीकडून त्याचे अभिनंदन केले होत आहे.व शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. भीमरावजी धोंडे , भा.ज.पा. युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस डॉ. अजय दादा धोंडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. डॉ. डी. बी. राऊत, प्रा. एस. जी. विधाते, माऊली बोउरखे, दत्तात्रय गिलचे, संजय शेंडे, पंडीत जवाहरलाल नेहरू ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. सुरेश बोडखे, उपप्राचार्य श्री. सुनिल भवर व सर्व प्राध्यापकांनी यांनी सुनिल जालिंदर पोकळे चे अभिनंदन केले.