★सभासदाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार – चेअरमन मधुकर सानप
शिरुर कासार | जीवन कदम
सभासदाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार आसुन सभासदाचे हित लाक्षात घेऊन काम करणार आसल्याचे लोकनेते गोपीनाथ मुंडे शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मधुकर सानप यांनी सांगितले.लोकनेते गोपीनाथ मुंडे शिक्षक सहकारी पतसंस्था शिरूर कासारची अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा सिद्धेश्वर संस्थानवर खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या सभेसाठी ज्योतीताई मेटे अप्पर सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांची विशेस उपस्थिती लाभली.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सिद्धेश्वर संस्थांचे मठाधिपती स्वामी विवेकानंद शास्त्री,आमदार बाळासाहेब आजबे, युवा नेते सागर धस ,नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर,उपनराध्यक्ष प्रकाश देसरडा, प.स.सदस्य प्रकाश खेडकर, सुनील चौधरी, निवृत्ती बेद्रे, माऊली सानप,गटनेते गणेश भांडेकर,जि.प.सदस्य श्री.सविताताई बडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश उगलमुगले,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भरत खरमाटे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशिद,जेष्ट नेते दशरथ वनवे,शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे,जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, नवनाथ ढाकणे, सरपंच रामदास हांगे,डॉ.भगवान सानप ,गटविकास अधिकारी सचिन सानप, प्र.गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रास्ताविक करताना अध्यक्ष मधुकर सानप यांनी संस्थेची २००५ ते २०२३ पर्यंतची वाटचाल विशद केली.मी या पदावर आहे तो प्रर्यंत या संस्थेचा कारभार पारदर्शक करणार.सभासदाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार.सभासदाचे हित लाक्षात घेऊन काम करणार.ठेवी स्विकारुन दिर्घ कर्ज मर्यादा वाढवणार.यावर्षी संस्थेला एक कोटी १५ लक्ष रुपये एवढा विक्रमी नफा झाल्याचे सांगुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडे शेअर्स म्हणून अडकलेले संस्थेचे अडकलेले २० लक्ष रुपये मिळवून द्यावेत अशी मागणी अप्पर सहकार आयुक्त ज्योतीताई मेटे यांच्याकडे केली आसता ज्योतीताई मेटे यांनी संस्थेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अडकलेले २० लक्ष रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले.तसेच संस्थेचा अहवाल पाहून समाधान व्यक्त केले व संस्थेने ग्राहक भंडार चालू करण्यची अपेक्षा व्यक्त केली.आमदार बाळासाहेब आजबे ,सागर धस,गटविकास अधिकारी सचिन सानप यांनी संस्थेनी केलेल्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी सर्व सभासदाना शुभेच्छा दिल्या.वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दुपारच्या सत्रामध्ये संस्थेचे सचिव विकास खेडकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.व अध्यक्ष मधुकर सानप सर यांनी सर्व सभासदांना साडेनऊ टक्के बोनस देण्याचे जाहीर केले.यावेळी विविध स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थांचा प्रमुख पाहुण्यांच्या हास्ते सन्मान करण्यात आला.शेवटी राष्ट्रगीताने वार्षिक सर्वसाधारण सभेचा समारोप झाला.कार्यक्रमासाठी संचालक दिलीप जायभाये,अविनाश गाडेकर,संजय ढाकणे,भागवत शिरसाठ,विष्णु मिसाळ,चंद्रकात ढाकणे,सुरेखा सानप,रंजना फुंदे,भगवान माने,शिवलिंग परळकर यांच्यासह शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.