★कै.सुरेश देशमाने यांच्या स्मरणार्थ सौताडा शाळेस केली 20 हजार रुपयाची मदत !
पाटोदा | प्रतिनिधी
कै. सुरेश आबाजी देशमाने यांचे दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी निधन झाले. सौताडा गावाविषयी असलेली आपुलकी, प्रेम त्यामुळे त्यांची इच्छा होती की मला सौताडा गावी घेऊन जा त्या प्रेमामुळे त्यांची मुलगी शिल्पा दिनेश फल्ले व जावई दिनेश दशरथ फल्ले (तळेगाव दाभाडे) यांनी शाळेला आवश्यक वस्तूं देण्याचे सरांना सांगितले , खडूच्या धुळीमुळे शिक्षक विद्यार्थी यांना श्वसनाचा व त्वचेचे होणारे त्रास पासून मुक्त करण्याचे त्यांनी ठरवले व शाळेसाठी दहा व्हाईट बोर्ड, पेन ,डस्टर, शाई असे साहित्य वीस हजार रुपये किमतीचे देण्यात आले.यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. दत्ता देशमाने (माणुसकीची भिंत ) यांनी दरवर्षी पाच हजार रुपयाचे शैक्षणिक साहित्य गरजू गरीब विद्यार्थ्याला देण्याचे ठरवले व गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शैक्षणिक दानपेटी शाळेला देण्याचे ठरवले .या कार्यक्रमास उपस्थित मुख्याध्यापक बेदरे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिमान शिंदे, उपसरपंच अण्णासाहेब शिंदे, कैलास शिंदे ,संग्राम सानप ,अजय शिंदे पाटील ,गणेश सानप ,अमोल देशमाने, रमेश देशमाने , वसंत देशमाने माजी मुख्याध्यापक ,शशिकांत देशमाने उपस्थित होते. मनोगत लाड सर व दत्ता देशमाने यांनी व्यक्त केले, बहारदार सूत्रसंचालन जावळे सर, आभार सरोदे सर यांनी केले. बहुसंख्य विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते.