स्वच्छता हीच सेवा…!
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत दरवर्षी स्वच्छते विषयी जनजागृती करत विविध उपक्रम राबविले जाऊन १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने यावर्षी” स्वच्छता ही सेवा २०२३” उपक्रम राबविण्यात येत असून, ‘कचरा मुक्त भारत’ ही संकल्पना असणार आहे. या सेवा उपक्रमात प्रत्येकाने कर्तव्य म्हणून कार्य करणे गरजेचे असून प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ, सुंदर, प्रदूषण मुक्त राहण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे या निमित्ताने सांगावेसे वाटते.
‘स्वच्छता हीच सेवा’ आहे ,म्हणून गाव पातळीवर लहानांपासून ते थोरात मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवत आपले गाव, आपला परिसर स्वच्छ करणे आवश्यक आहे .प्रत्येक दिवशी नियोजन करून कार्य करणे व आपला एक तास समाजासाठी आपल्या परिसरासाठी देणे आपले दायित्व समजून कार्य करणे भविष्यासाठी लाभदायक ठरणारे आहे.यावर्षीची संकल्पना कचरा मुक्त भारत असून या अंतर्गत दृष्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावर ती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या दरम्यान परिसर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविले जाणार असून यात ग्रामीण भागातील बस स्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदीकाठ, घाट, नाले, समुद्र किनारे सार्वजनिक ठिकाणासह इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. एकल वापरातील प्लास्टिक न वापरणे व दृष्यमानाबाबत गावागावांत जनजागृती करणे, शालेय स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करणे, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यातून उत्पन्न घेणे, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी भित्तिचित्रे काढणे व कचरा वर्गीकरण पेट्या ठेवणे यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्वच्छतेबाबत युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी तरुणांच्या नेतृत्वाखाली सर्व गटांना एकत्र करून स्वच्छतेचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून त्यासाठी आता प्रत्येकाची साथ मिळणे गरजेचे आहे.सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी आपल्या अनेक अभियाने राबवले जातात त्यातील हे अभियान महत्त्वाचे आहे.
स्वच्छता न ठेवण्याने आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. आपण आपलेच आरोग्य धोक्यात घालत असून आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून, कचरा इतरत्र न टाकता कचरापेटीमध्ये टाकून एक प्रकारे कार्य करून सेवा आरोग्यच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे .अस्वच्छ वातावरणात राहिल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याउलट आपण आपल्या आजूबाजूचा परिसर, नदी, नाले, कचऱ्याचे योग्य नियोजन केले तर या गोष्टींचा आपल्या सर्वांना चांगला लाभ होतो हे निश्चित.स्वच्छता ठेवणे ही एक सेवाच आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तर आपणही निरोगी राहू शकतो.
म्हणून म्हणून हा उपक्रम प्रत्येकाने आपल्या परीने गावागावात यशस्वीपणे राबवत आपला परिसर स्वच्छ करावा व नेहमी सुंदर ठेवावा.आपला भारत कचरा मुक्त करण्यासाठी सर्वांनी कृतीयुक्त कार्य करावे,आपल्या परिसरा बरोबरच आपले हे आरोग्य निरोगी राहील या दृष्टीने नेहमी सतर्क राहावे…
– राहुल मोरे
मो.न.९४०४१८११८१