★द बा घुमरे आदर्श शिक्षक पुरस्कार,डॉ दत्ता नलावडे,डोंगरे विजयकुमार,वाजे रामेश्वर,घोरपडे विक्रम,शेख मुन्शी बाबामिया सन्मानित!
बीड | प्रतिनिधी
बीड येथील शिक्षक नेते द बा घुमरे शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ हॉटेल ग्रँड यशोदा येथे संपन्न झाला असून या कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न झाला असून या वर्षी चा आदर्श शिक्षक पूरस्कार वाजे रामेश्वर आसाराम , दत्तात्रय साहेबराव नलावडे , डोंगरे विजयकुमार बाबुराव , घोरपडे विक्रम बबनराव , इंगोले अतुल गोरख , शेख मुन्सी बाबामिया यांना विविध मान्यवरांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ बीड येथील हॉटेल ग्रँड यशोदा येथे संपन्न झाला असून या कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ शिक्षक नेते शिक्षण संस्था महामंडळ सरचिटणीस उत्तम पवार हे होते , या प्रसंगी युवकांना घडवण्याचे काम शिक्षक करू शकतात युवा पिढी घडवण्याचे काम सक्षम पणे करावे असे आवाहंन दिपक घुमरे यांनी केले. या प्रसंगी युवक राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष विजयसिँह बाळा बांगर , दै प्रजापत्र कार्यकारी सम्पादक संजय मालपाणी , मुख्याध्यपक संघ जिल्हा अध्यक्ष जे एम पैठणे , उपशिक्षणधिकारी मोहन काकडे , राष्ट्रवादी युवती जिल्हा अध्यक्ष प्रियाताई डोईफोडे यांची उपस्थिती होती या प्रसंगीं युवानेते बाळा बांगर म्हणाले कि शिक्षक हा संघर्ष करावयास शिकवतो म्हणून विध्यार्थी घडतात म्हणून ते विध्यार्थी प्रिय असतात शिक्षक हा मार्गदर्शक गुरु असून आज या गुरुना पुरस्कार देऊन सन्मानित केले जात आहे हि बाब महत्वाची आहे , उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे म्हणाले कि आज शिक्षकांच्या आणि संस्थेच्या प्रश्नावर शिक्षक संघटना आणि संस्था महामंडळ ये संस्था आणि विध्यार्थी यांना घडवू शकते , या प्रसंगी प्रियाताई डोईफोडे , जे एम पैठणे यांची समयोचित भाषण झाले या प्रसंगी शिक्षक शिक्षिका बहुसंख्येने हजर होते.