विवेकानंद पतसंस्थेने सदोष व्याज आकारणीचा तुघलकी निर्णय रद्द करावा – बाळासाहेब महाडिक
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेने कर्जावरील व्याज आकारणी रद्द करून जुनी पध्दतीने व्याज आकारणी करावी अशी आग्रही मागणी सभासदांसह शिक्षक नेते बाळासाहेब महाडिक यांनी केली आहे.
रविवारी दि.23 सप्टेंबर रोजी विवेकानंद पतसंस्थेची सर्वसाधारण सभा होत असून त्यानिमित्ताने प्रसिद्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विवेकानंद पतसंस्था ही अगोदर व्याजाची जास्तची रक्कम वसूल करून मुद्दल ची कमी रक्कम वसूल करते ही तुघलकी पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे कर्ज वसूल करण्यात यावे मागील सर्वसाधारण सभेच्या वेळी संस्थेच्या अध्यक्षनी प्रश्नउत्तराचा तासात व्याज आकारणी संबधात आष्टी तालुक्यातील सर्व शिक्षकांना बोलावून बैठक घेऊन व्याज आकारणीच्या संबंधात विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल असा शब्द दिला होता परंतु अध्यक्ष महोदयांनी काहीही न करता कोणतीही बैठक न बोलविता स्वतःच निर्णय घेतले म्हणजेच बोलाची कढी व बोलाचा भात अशी गत या संचालक मंडळाची झाली आहे अशी टिका महाडिक यांनी केली. वास्तविक पाहता विवेकानंद पतसंस्थेचा व्यवहार कोट्यवधी रुपयांचा असताना सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल मात्र पी.डि.एफ. स्वरूपात दिला जातो , संचालक मंडळाकडे स्वतःच्या मिटिंग भत्या साठी लाखो रुपये आहेत प्रशिक्षण घेण्याच्या नावाखाली पर्यटन करता येते, किरकोळ खर्चासाठी हजारो रुपये आहेत परंतु वार्षिक अहवाल सादर करण्यासाठी यांच्याकडे पैसे शिल्लक नाहीत याचा गौडबंगाल काय?असा प्रश्न उपस्थित केला आहे करोडो रुपयांचा वार्षिक व्यवहार हा आहवाल संस्थेच्या वॉट्सअप ग्रुपवर चालत नसतो असा टोला बाळासाहेब महाडिक यांनी मारला असून संस्थेत 80℅ पेक्षा जास्त प्रमाणात भांडवल सभासदांचे असून तोकडी भांडवल बँकेकडून सी.सी. स्वरूपात गरज नसताना घेतली जाते त्यामुळे सभासदांना जास्तीचा लाभांश मिळत नाही .बारा टक्के लाभांश वाटप करण्यात यावा व व्याजदर सहा टक्के करण्यात यावा अशी मागणी पत्रकाद्वारे केली आहे तसेच विवेकानंद पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपून वर्ष झाले आहे परंतु संचालक मंडळाने निवडणूक घेण्यासंदर्भात एक कागद ही सहाय्यक निंबधकाकडे दिला नाही ” किती दिवस खुर्चीला चिटकून बसणार असा सवाल बाळासाहेब महाडिक यांनी केला आहे.गेल्या पाच वर्षांपासून काही संचालक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहत नाहीत त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयात कळवून त्यांचावर कायदेशीर कारवाई का करण्यात आली नाही असाही प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्या कर्मचार्याना 39 हजार रुपये बोनस परंतु दरमहा इमानेइतबारे सभासदांच्या हप्त्याची वसूल करून संस्थेकडे पाठवनाऱ्यांना मुख्यध्याकाना मात्र तीनशे रुपयाचा बँगा असा तुघलकी कारभार या संचालक मंडळाचा आहे असा आरोप महाडिक यांनी केला आहे “सभासदांना काही देयचे असेल तर काटकसर स्वतःला काही घेयचे असेल तर मोठं मन ही नीती या संचालक मंडळाची आहे असे पत्रकात म्हटले आहे या पत्रकावर स्वानंद थोरवे, रत्नाकर चव्हाण, गोरक्ष लाड, भाऊसाहेब काळे, कैलास शेकडे, सुवर्थ गव्हळे, राजेंद्र लाड, सखाराम थोरवे, उमेश झाम्बरे , प्रमोद नरोटे, साहेबराव कोहक , प्रशांत दगडे, शिवाजी गोंदकर, रामभाऊ घुले, नवनाथ चौधरी, अशोक गाडे संदीप औटे, सोपान काकडे, इंद्रकुमार झांजे, नारायण तरटे, हनुमंत मुटकुळे, सतिश सायंबर, संपत गाडे, नीतेश कुटे, संपत एकशिंगे, सतीश सायंबर, भाऊसाहेब गाडे आदींनी पत्रकात म्हटले आहे.